शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील ‘विश्वास’ उभारतोय मानवतेची खरीखुरी भिंत

By admin | Updated: November 3, 2016 23:39 IST

आदर्शवत उपक्रम : दिवाळीचे पैसे, स्पर्धेतून मिळालेल्या रकमेतून कोकरुडमधील महाविद्यालयीन युवकाने केली मदत

 बाबासाहेब परीट ल्ल बिळाशी कोकरुड (ता. शिराळा) येथील महाविद्यालयीन युवकाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमधून मिळालेले पैसे आणि दिवाळीसाठी वडिलांनी दिलेल्या पैशातून, ऐन दिवाळीत दारात शिळे-पाके तुकडे मागायला आलेल्या गोपाळ समाजाच्या आणि नंदीवाल्यांच्या पालावर जाऊन त्यांच्या २0 मुलांना नवीन कपडे व दिवाळीचा फराळ दिला. यातून त्याने खरीखुरी माणुसकीची भिंत उभी करण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला. या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे विश्वास घोडे. समाजात धर्म, वंश, पंथ, पैसा, प्रतिष्ठा आणि जातीपातीच्या भिंती माणसा-माणसात उभ्या करून, गावात गाव आणि भावात भाव न राखण्याचे षड्यंत्र रचून, संपूर्ण समाजव्यवस्था खिळखिळी करण्याचा आजचा काळ. एकीकडे मोठ्या आवाजाचे फटाके फोडून, बँ्रडेड कपड्यांच्या स्पर्धा करून दिवाळी साजरी होत असताना, ‘माई, शिळंपाकं द्या.., फराळाचं गोड नको, शिळी भाकर द्या...’ असं म्हणत दुसऱ्याच्या दारात जाऊन दाताच्या कण्या करणारी चिमुकली लेकरे पाहून विश्वास घोडे या युवकाच्या मनात माणुसकीचा पाझर फुटला. हा युवक कमावता नाही. पण दातृत्वाला मोठे मन असावे लागते, धन नसले तरी चालते. त्याप्रमाणे त्याने वडिलांनी कपड्यांसाठी दिलेले तीन हजार रुपये, तसेच भाषणातून मिळालेल्या काही पैशातून गरीब मुलांना कपडे देण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना त्याने त्याच्या मराठी शाळेतल्या गुरुजींना सांगितली. त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले व त्यांच्यावतीने आणखी पाच कपड्यांचे जोड दिले. त्यानंतर विश्वासने भाऊबीजेदिवशी कोकरुड फाट्याशेजारी असणाऱ्या पालांवर जाऊन तेथील २0 मुलांना शालेय गणवेश दिले व त्यांनाही नव्या कपड्यांचा आनंद मिळवून दिला. स्पर्धा परीक्षांच्या नादी लागून अद्याप हाताला काहीही न लागल्याने बेजार झालेल्या, पण उमेद न हरलेल्या, स्वत:च्या पायावर उभे न राहता इतरांना उभे करण्यासाठी धडपडणाऱ्या या युवकाचा हा ‘विश्वास’ पाहून साऱ्या गावाला अभिमान वाटत आहे. आपल्याला असलेले मोजके कपडे पुरेसे आहेत, गरजेपेक्षा जास्त वापरणे म्हणजे गरजवंतांना ओरबाडणेच, हे त्याचे मत. शाळेत असताना त्याच्या गुरुजींनी ‘एक लाडू गरिबांसाठी’ हा संकल्प सोडला होता. त्यांचाच वारसा तो पुढे चालवत आहे. त्याचा हा उपक्रम धनवानांना अचंबित करणारा आहे. एकीकडे ‘जुने नको असलेले देऊन जा आणि ज्यांना हवे आहे, त्यांनी घेऊन जा’, या संकल्पनेवरील माणुसकीची भिंत सोशल मीडियावर चर्चेत आली असताना, एका महाविद्यालयीन युवकाने कोणताच डामडौल आणि दिखावा न करता माणुसकीचा सेतू यथाशक्ती उभा करून आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या सद्सद्विवेकबुध्दीला सलाम करायलाच हवा!