शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीनगर रस्त्यावरून पुन्हा वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:11 IST

सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील शंभर फुटी रस्त्याच्या डांबरीकरणावरून मंगळवारी पुन्हा वादावादीचा प्रकार घडला. नगरसेवक संतोष पाटील व काही स्थानिक ...

सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील शंभर फुटी रस्त्याच्या डांबरीकरणावरून मंगळवारी पुन्हा वादावादीचा प्रकार घडला. नगरसेवक संतोष पाटील व काही स्थानिक नागरिकांनी बंद पडलेले रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे स्त्याच्या मूळ जागेवर दावा करणाऱ्या ४२ नागरिकांनी त्यांना थांबविले. दोन्ही गटात जोरदार वादावादी व धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.रस्त्याच्या मालकीवरून हा वाद उफाळलेला असताना, उपायुक्तांनी १७ नोव्हेंबरपर्यंत रस्त्याचे कामच थांबवण्याचे आदेश दिले. या प्रभागाचे नगरसेवक संतोष पाटील यांनी महापौर, सभापती यांनी प्रशासनावर दबाव आणून भाजपच्याच आमदारांनी उद्घाटन केलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले, असा आरोप केला आहे.सांगलीच्या सह्याद्रीनगरमधील महापालिकेने सुरू केलेल्या शंभर फुटी रस्त्याचे काम येथील ४२ कुटुंबांनी बंद पाडले. जागेवर दावा करीत या कुटुंबांनी रस्त्याकडेला पुन्हा घरे उभारली. न्यायालयीन कागदपत्रे, जागेच्या कागदपत्रांवरून त्यांनी आपला दावा मांडला आहे. महापालिकाच बेकायदेशीरपणे काम करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे महापालिकेने व कॉँग्रेस नगरसेवक संतोष पाटील यांनी रस्त्याचे काम कायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या रस्त्याच्या मालकीवरून हा वाद उफाळला आहे. मंगळवारी रस्त्यावर दावा करणारे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांत धक्काबुक्कीही झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही गटाला हुसकावून लावले.यावेळी ही जागा आमची असल्याने यावर रस्ता होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत ४२ कुटुंबांनी हे रस्त्याचे काम बंद पाडले; मात्र स्थानिक नागरिकांनी पुन्हा हे काम सुरू केले. स्वत: नगरसेवक संतोष पाटील आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर खडी पसरण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आले. त्यामुळे वादावादीसह धक्काबुक्की झाली. यावेळी संजयनगर पोलिसांनी तातडीने धाव घेत दोन्ही गटाला शांत केले; मात्र पोलिसांसमोरसुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे. दरम्यान, दुपारपर्यंत या या परिसरात वातावरण तणावाचे होते.यादरम्यान इलाही बारुदवाले यांच्या तक्रारीनंतर महापालिकेत तातडीची बैठक झाली. या बैठकीत १७ नोव्हेंबर रोजी याबाबत बैठक बोलावण्यात आली असून, तोपर्यंत या रस्त्याचे काम बंद ठेवण्याचे तसेच या रस्त्यावर कोणीही अतिक्रमण करू नये, याबाबतचे आदेश उपायुक्त स्मृती पाटील यांनी शहर अभियंत्यांना दिले. त्यामुळे दुपारनंतर या रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे.