शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रेशन दुकानदारांचा बायोमेट्रिकला विरोध

By admin | Updated: January 7, 2015 23:23 IST

इस्लामपुरात बैठक : विजय पाटील यांना साकडे

युनूस शेख- इस्लामपूर  -वाळवा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांत बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करीत, दुकानांचे राजीनामे देण्याचा इशारा स्वस्त धान्य दुकानदारांनी दिला आहे. आज (बुधवारी) एका वयोवृध्द दुकानदाराने विजयभाऊ पाटील यांना साकडे घालताना, ‘आमचे आयुष्य या धंद्यात गेले. गेली ३0 वर्षे भाऊ व जयंत पाटील यांच्याबरोबर बायकोसारखे एकनिष्ठ राहिलो. तुमच्या नावाचे कुंकू लेवून तारुण्य गेले. आता म्हातारपणी आम्हाला कोण सांभाळणार? या वयात दुसऱ्या नवरोबाची शोधाशोध करणे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा आत्महत्या बरी’, असा निर्वाणीचा इशारा दिला.स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याच्या मुद्यावरुन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. आज त्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये या योजनेस विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोमेट्रिक यंत्रणा इंग्रजी माध्यमातून चालवणे अशिक्षित व अल्पशिक्षित दुकानदारांना जमणार नाही आणि समजणारही नाही. ही योजना राज्यात इतरत्र कोठेही नाही. विजेचा प्रश्न आहे. यंत्राला रेंज येत नाही. बायोमेट्रिकला मोबाईलसारखे रिचार्ज कार्ड मारावे लागते. तो खर्च वाढणार आहे.शासनाकडून कार्डधारकांना सातत्याने धान्य मिळत नाही. दोन-दोन, चार-चार महिने धान्य मिळत नाही. डिसेंबरपासून धान्य नाही. बायोमेट्रिक यंत्र बंद पडल्यास दुकानदारांविरुध्द तक्रारी वाढून अन्याय होणार आहे. त्यातच गेल्या २५-३0 वर्षांपासून जयंत पाटील यांना सहकार्य करुनही ते आपल्या तालुक्यात बायोमेट्रिक यंत्रणा लवकर बसावावी, असे बोलत आहेत, हे असे का?सकाळी त्यांच्या निवासस्थानी न्याय मिळावा म्हणून सर्व दुकानदार त्यांना भेटले. त्यांनी १२ जानेवारीला जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या कुंकवाचे काय होणार? हा यक्षप्रश्न बनला आहे.यावेळी एस. ए. ठोंबरे, एस. एच. पाटील, राजेंद्र लाड, प्रकाश चौगुले, उत्तम पाटील, साहेबराव कोरे यांच्यासह दुकानदार उपस्थित होते....मग बायोमेट्रिक हाताळणार कसे?तालुक्यातील दुकानदारांची जुनी पिढी कोणत्याही अडीअडचणींचा विचार न करता गोरगरीब जनतेची सेवा करीत आहे. या दुकानाच्या व्यवसायावरच कुटुंबाची उपजीविका भागवत आहे. त्यांना मराठी कसे-बसे येते. बायोमेट्रिक हा शब्दच उच्चारता येत नाही. मग हे यंत्र इंग्रजीत कसे हाताळणार? अशा सगळ्या मुद्द्यांवर विचार होऊन शेवटी विजयभाऊ पाटील यांना साकडे घालण्याचे ठरले.