शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘मोरयाऽऽ’च्या जयघोषात तासगावात रथोत्सव

By admin | Updated: September 18, 2015 23:34 IST

२३६ वर्षांची परंपरा : भाविकांचा उदंड प्रतिसाद; दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

तासगाव : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ... मंगलमूर्ती मोरयाऽऽ’चा दुमदुमणारा जयघोष, अमाप गर्दी, गुलाल-पेढ्यांची उधळण आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात शुक्रवारी तासगावचा २३६ वा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा पार पडला. गणपती पंचायतन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच गणेशभक्तांच्या उपस्थितीने अवघे तासगाव शहर फुलून गेले होते. पहाटेपासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. दहापासून मंदिरात गर्दी वाढू लागली. तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा आहे. तो नवसाला पावतो, अशी आख्यायिका असल्यामुळे गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने होणाऱ्या गणपतीच्या रथोत्सवास महाराष्ट्रासह राज्याबाहेरील भाविकांनी हजेरी लावली.गुरुवारी वाजत-गाजत तासगाव संस्थानच्यावतीने गणपतीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली. शुक्रवारी सकाळी राजवाड्यात राजेंद्र पटवर्धन आणि निरंजन पटवर्धन यांच्याहस्ते आरती झाली. दुपारी बारा वाजता वाद्यांच्या गजरात पालखीमधून शाडूच्या मूर्तीचे व ऐतिहासिक १२५ किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचे राजवाड्यात आगमन झाले. पालखीसमोर गोंधळी, होलार व कैकाडी समाजाच्या मंडळींनी केलेल्या पारंपरिक वाद्यांच्या गजराने परिसर मंत्रमुग्ध झाला. या सोहळ्यात मोठ्या दिमाखात सहभागी झालेली संस्थानची गौरी हत्तीण भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. गणेशमूर्ती राजवाड्यातून मंदिरात आणल्यावर विधिवत पूजा करण्यात आली. आरतीनंतर दोन्ही मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. तेथून तीन मजली आणि तीस फूट उंची असणाऱ्या संस्थानच्या रथात या मूर्ती ठेवण्यात आल्या. हा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा, नारळाच्या तोरणांनी सजवण्यात आला होता. भाविकांनी दोरखंडाच्या साहाय्याने हा रथ काशीविश्वेश्वर मंदिराकडे ओढत नेला. रथ ओढण्यासाठीही भाविकांची झुंबड उडाली होती. भाविकांनी बांधलेल्या नारळाच्या तोरणांनी रथ फुलून गेला होता. रथासमोर अनेक झांजपथक मंडळांनी मोठ्या उत्साहात मानवंदना दिली.मातीच्या व पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवल्यानंतर निरंजन पटवर्धन यांच्याहस्ते आरती झाली. राष्ट्रगीत म्हणून एक वाजता रथोत्सवास सुरुवात झाली. झांजपथकाचा ठेका, ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा गजर आणि गुलाल, पेढ्यांची उधळण करीत रथ ओढण्यास सुरुवात झाली. गणपतीबाप्पा रथात बसविल्यानंतर मंदिरापासून एक किलोमीटरवर असलेल्या काशीविश्वेश्वर मंदिराकडे रथ ओढत नेण्यात आला. तेथे शंकर-गणपती भेट झाल्यानंतर शाडूच्या मूर्तीचे कापूर ओढ्यानजीक विहिरीत शास्त्रशुध्द पध्दतीने विसर्जन करण्यात आले. त्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला. तब्बल चार तास रथोत्सव सोहळा सुरू होता. गणेश मंडळांसह अनेकांनी मंदिराबाहेर प्रसाद वाटपाचे स्टॉल उभे केले होते. (वार्ताहर)चोख पोलीस बंदोबस्त तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी तासगाव पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनीही रथोत्सवास भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंंगळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे स्वत: रथोत्सवाच्या ठिकाणी उपस्थित होते.रथोत्सव सोहळ्यास खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: रथाचे दोर धरून काही वेळ रथ ओढला.