शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कापराच्या दराने ग्राहकांच्या अंगात भरले कापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:04 IST

गणेशोत्सवात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कापराच्या दराने यंदा विक्रम केला आहे. साधा कापूर १ हजार २00 रुपये तर भीमसेनी कापूर २ हजार रुपये किलोंवर गेला आहे. कापराचे गगनाला भिडलेले दर ऐकून ग्राहकांच्या अंगात कापरे भरत आहेत.

ठळक मुद्देकापराच्या दराने ग्राहकांच्या अंगात भरले कापरेबाराशे रुपये किलोने विक्री : भीमसेनी कापूर २ हजार रुपये किलो

अविनाश कोळीसांगली-गणेशोत्सवात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कापराच्या दराने यंदा विक्रम केला आहे. साधा कापूर १ हजार २00 रुपये तर भीमसेनी कापूर २ हजार रुपये किलोंवर गेला आहे. कापराचे गगनाला भिडलेले दर ऐकून ग्राहकांच्या अंगात कापरे भरत आहेत.राज्यभरात दरवर्षी गणेशोत्सवात कापराची मोठी आवक होते. यंदा कोरोना काळात मुंबईचा घाऊक व्यापार विस्कळीत झाला आहे. कापूर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवरही परिणाम झाला आहे. कामगारांची अपुरी संख्या, लॉकडाऊन काळात ठप्प झालेला उद्योग यामुळे कापराचे यंदा मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.

सागंलीच्या बाजारात मागणीच्या तुलनेत केवळ ६0 टक्के पुरवठा आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. कापराच्या दराने मोठा विक्रम केला आहे. त्यामुळे कापूर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. १ किलो काजूपेक्षाही कापूर महाग झाला आहे. श्रावणातील उत्सव, भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव, त्यापाठोपाठ येणारा नवरात्रोत्सव यामुळे आगामी दोन महिने कापराची मागणी कायम असणार आहे.मागील वर्षीपेक्षा अधिक दरगेल्या तीन वर्षात कापराचे दर वाढतच आहेत. गतवेळी साधा कापूर ९00 ते ९५0 रुपये किलोे होता. यंदा त्यात तिनशे रुपयांची वाढ झाली आहे. भीमसेनी कापराचा दर मागील वर्षी १ हजार रुपये किलो होता. यंदा तो २ हजारावर गेला आहे. म्हणजेच भीमसेनी कापूरचा दर दुप्पट झाला आहे.

भीमसेनी कापूर हा आरोग्यासाठी चांगला असल्याचे मानले जाते. त्यावर मतमतांतरे असली तरी कोरोना काळात खोकला, सर्दीवर घरगुती उपाय म्हणून यास मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी भीमसेनी कापूर जाळला जात आहे. मागणीत मोठी वाढ झाल्याने त्याचे दरही आता गगनाला भिडले आहेत.का वाढताहेत दर

  • कोरोनामुळे लॉकडाऊन काळात उत्पादनावर मोठा परिणाम
  • मोठा पुरवठादार असलेल्या मुंबई शहरातील यंत्रणा विस्कळीत
  • वाहतुकीचा खर्च वाढला
  • उत्सवामुळे मागणी वाढली
  • कोरोना काळात आयुर्वेदिक उपाय म्हणूनही मागणीत वाढ
  • मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी पुरवठा

गेल्या तीन वर्षापासून कापराचे दर वाढत आहेत. यंदा सर्वाधिक दर असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. सध्याची स्थिती पाहता हे दर लवकर सामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे महागड्या दरानेच कापराची खरेदी ग्राहकांना करावी लागणार आहे.एम. युसुफ,विक्रेते, सांगली

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली