मिरज : मिरजेत अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध देऊन व अश्लील व्हिडिओ दाखवून चिकन विक्रेत्याने वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, फय्याज मेहबूब कोकणे (वय २५, रा. बोकड चौक, मिरज) या चिकन विक्रेत्यास पोलिसांनी अटक केली.
फय्याज कोकणे याचे मिरजेत बोकड चाैकात चिकन विक्रीचे दुकान आहे. दुकानात चिकन नेण्यासाठी येणाऱ्या १२ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीशी ओळख झाल्यानंतर फयाज याने दि. २२ मार्च रोजी मुलगी घरात एकटीच असताना फय्याज कोकणे तिच्या घरी गेला. त्याने मुलीस घरातून बाहेर बोलावून नेले. तिला गुंगी येणाऱ्या औषधाची गोळी खायला देऊन पुन्हा घरात नेऊन तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखविले. ती विरोध करीत असताना तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर फय्याज याने वारंवार असा प्रकार सुरू केल्यानंतर पीडित मुलीने आईला याची माहिती दिली. पीडितेच्या आईने मिरज शहर पोलिसांत धाव घेऊन फय्याज मेहबूब कोकणे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी फय्याज कोकणे यास अटक करून बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.