शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा केंद्रातील तरुणीवर इस्लामपुरात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:43 IST

इस्लामपूर : आटपाडी तालुक्यातील २८ वर्षीय तरुणीवर तरुणाने इस्लामपूर येथे खोलीवर नेऊन बलात्कार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. ही ...

इस्लामपूर : आटपाडी तालुक्यातील २८ वर्षीय तरुणीवर तरुणाने इस्लामपूर येथे खोलीवर नेऊन बलात्कार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. ही तरुणी पोलीस भरतीसाठी येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास आणि सराव करत होती. पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. त्याला सहा दिवस पोलीस कोठडी मिळाली. मनोज बाळासाहेब कांबळे (वय २८, रा. खरसुंडी, ता. आटपाडी) असे संशयिताचे नाव आहे.

पीडित तरुणी बँकेत कंत्राटी पद्धतीने नोकरी करत असताना, तिची मनोज कांबळे याच्याशी तोंडओळख झाली. दीड वर्षापूर्वी ती पोलीस भरतीच्या तयारीसाठी इस्लामपूर येथे आली. तीन मैत्रिणींसमवेत ती भाड्याने खोली घेऊन राहत आहे. चार महिन्यांपूर्वी मनोजने याच अकॅडमीत प्रवेश घेतला. पूर्वीच्या ओळखीमुळे दोघांचे फोनवर बोलणे, तसेच भेटणे होत होते. सप्टेंबर महिन्यात वडील आजारी पडल्यामुळे ती गावी गेली. त्यावेळी मनोजने तिला फोन करून, अभ्यासासाठी परत बोलावून मदतीचे आमिष दाखविले. दरम्यान, तिच्या वडिलांचे निधन झाले. नंतर ती पुन्हा इस्लामपूरला आली.

शनिवारी रात्री मनोजने तरुणीकडे मोपेड मागण्याचे निमित्त केले. ती तिच्या मैत्रिणीसह आष्टा नाक्यावर आल्यावर मनोजने तिचा मोबाईल काढून घेतला. मोबाईल घेण्यासाठी रात्री दहा वाजता त्याच्या खोलीवर बोलावले. नंतर मनोज तिच्या मैत्रिणींच्या मोबाईलवर फोन करून, तिला पाठवून देण्यास धमकावत होता. मध्यरात्रीनंतर पीडित तरुणी त्याच्या खोलीवर गेली असता, त्याने तिला खाेलीत घेऊन आतून कुलूप लावले. तिला धमकावत गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचे चित्रीकरण केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने अकॅडमीच्या संचालकांना हा प्रकार सांगितला. रात्री उशिरा तिने पोलिसात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते अधिक तपास करत आहेत.

फोटो :१४ मनोज कांबळे