शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कांदे येथे मुलीवर बलात्कार

By admin | Updated: April 16, 2017 22:53 IST

दोघांविरूद्ध गुन्हा : एकास पकडून नातेवाईकांकडून बेदम चोप

शिराळा/मांगले : कांदे (ता. शिराळा) येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी मुख्य संशयित अक्षय महावीर घोलप (वय २0, रा. थेरगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) यास पकडून बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तर यातील दुसऱ्या संशयिताचा शोध सुरु आहे.अक्षय घोलप व त्याचा मित्र हे दोघेही दुचाकीवरुन कांदेत नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. ते या मुलीच्या घरीही गेले होते. रात्री मुलगी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी अक्षयने तिचा पाठलाग केला. व अंधाराचा फायदा घेत तिच्या तोंडाला रुमाल बांधून जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसविले. अक्षयच्या मित्राने तिला दुचाकीवर पकडून ठेवले. या दोघांनी तिला कांदे-सावर्डे पुलाजवळ नेले. तेथे अक्षयने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही घटना कोणाला सांगू नये, यासाठी धमकीही दिली. दोघांनीही तिला तिच्या घराजवळ सोडून पलायन केले. या प्रकारामुळे मुलीची प्रकृती बिघडली. घरच्यांनी तिची चौकशी केल्यानंतर, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. नातेवाईकांनी अक्षयचा शोध घेण्यासाठी थेट त्याचे थेरगाव गाठले. तेथे अक्षयला घरातून ओढून बेदम चोप दिला. त्याला तेथून ताब्यात घेऊन शिराळा पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही मुलगी सहावीत शिकते आहे. मुलीतर्फे तिच्या आईने शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील अक्षयची कसून चौकशी केली असता, आपण एकटेच होतो, असे त्याने सांगितले. तरीही पोलिस चौकशी करीत आहेत. त्याचा मित्राचा शोध सुरू आहे. (वार्ताहर)मित्राचे पलायन; शोधासाठी पथक रवाना या मुलीचे नातेवाईक थेरगावला गेले; त्यावेळी त्याचा मित्र अंधाराचा गैरफायदा घेऊन शौचालयात लपून बसला. त्याने शौचालयाचे दार मोडून पलायन केले. पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी कांदे येथे भेट देऊन पाहणी केली व या मुलीची चौकशी केली. त्याच्या मित्राच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना केली आहेत.