शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत लुटारू टोळ्या पुन्हा सक्रिय धुमाकूळ सुरूच : रात्रीच्या रेल्वेगाड्यांत गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:41 IST

मिरज : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी तीन प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन त्यांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा

मिरज : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी तीन प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन त्यांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रात्रीच्या रेल्वेगाड्यांत प्रवाशांची गर्दी असल्याने चोऱ्याचे सत्र सुरुच आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये वारंवार होणाऱ्या   चोऱ्यासोबतच, गुंगीचे औषध देऊन लूटमारीचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी हैराण आहेत.

मंगळवारी पहाटे मिरजेकडे येणाऱ्या म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमध्ये एस नऊ बोगीतील भवरलाल राजपुरोहित त्यांची पत्नी गंगादेवी व प्रभुराम या तीन प्रवाशांना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अज्ञात चोरट्याने भवरलाल यांच्या बॅगेतील १ लाख १२ हजार रूपये लंपास केले. कर्नाटकातील अरसीकेरी स्थानकाजवळ बिरूरदरम्यान हा प्रकार घडला. अजमेर एक्स्प्रेस मिरजेत आल्यानंतर बेशुध्द प्रवाशांना मिरज रेल्वे पोलिसांनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १ लाख १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याबाबत मिरज रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करून अरसीकेरी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.रेल्वेच्या आरक्षित बोगींसह वातानुकूलित व सर्वसाधारण बोगीतही प्रवाशांच्या बॅगा व मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याने एक्स्प्रेसमधून रात्रीचा प्रवास प्रवाशांना चांगलाच महागात पडत आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने लोणावळा ते पुणेदरम्यान रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरणाºया टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वी हुबळी-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला दुधातून गुंगीचे औषध देऊन लुटण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी दौंड व लोणावळा परिसरात प्रवाशांना खजुरामधून गुंगीचे औषध देणाºया चोरट्यांना चार महिन्यापूर्वी पकडले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील गुन्हेगारासही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यानंतरही अशा प्रकारचे गुन्हे सुरूच आहेत. प्रवाशांचे साहित्य चोरणाºया टोळ्यांचा रात्रीच्या रेल्वे गाड्यांत धुमाकूळ सुरू असून आरक्षित बोगींसह वातानुकूलित बोगीतूनही प्रवाशांच्या मौल्यवान साहित्याची चोरी होत आहे.

मिरज-पुणे मार्गावर रात्रीच्यावेळी खिडकीतून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यात येत आहेत. गर्दीत प्रवाशांचे दागिने लंपास करण्यात येत आहेत. रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाने चोरट्यांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केली नसल्याने चोरट्यांचे फावले आहे.सुरक्षा असूनही लूटमारकोकण रेल्वे मार्गावरही गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणाºया टोळ्या सक्रिय आहेत. पुणे-मिरज मार्गावर असे गुन्हे रोखल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. रात्रीच्या रेल्वेगाड्यांत सशस्त्र पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचा बंदोबस्त असतानाही चोºया होत आहेत व पुणे ते मिरजदरम्यान एक्स्प्रेसमध्ये छोट्या स्थानकावर प्रवासी महिलांच्या पर्स व दागिने लुटण्यात येत आहेतच.