शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रअण्णांसमोर विरोधक हतबल!

By admin | Updated: June 11, 2015 00:25 IST

माणगंगा, सूतगिरणीवर वर्चस्व : सेना-भाजपला दुहीचा फटका

अविनाश बाड - आटपाडी -मागील महिन्याभरात आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना आणि बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी या दोन मोठ्या संस्थांच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले होते. अखेर या दोन्ही संस्थांवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली. आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत रंग आणला, पण माघार घेतली, तर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारांना मात्र सभासदांनी नाकारले. राजेंद्रअण्णांच्या या डबल धमाक्याने देशमुख गटाच्या विरोधकांची गोची झाली आहे. माणगंगा कारखाना स्थापनेपासून यंदा प्रथमच एवढी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपनेही पॅनेल उभे केले. उमेदवारी अर्जासोबत ऊस उत्पादक शेतकरी असल्याच्या पूर्ततेबाबत थेट उच्च न्यायालयापर्यंत काहींनी धाव घेतली. त्यामुळे यंदाची निवडणूक अभूतपूर्व होण्याची चिन्हे निर्माण झाली. शिवसेना आणि भाजप यांची युती शेवटपर्यंत झाली नाही. मात्र गोपीचंद पडळकर यांनी ‘एकला चलो रे’ म्हणत प्रचारसभांचा धडाका लावला.देशमुख गटाच्या विरोधात हे दोन गट एकत्र आले असते, तर कारखान्याच्या निवडणुकीनंतर एका गटाचे अस्तित्व संपुष्टात आले असते. राजेंद्रअण्णांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. त्यांना सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे यांनीही साथ दिली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा झाल्या. दुष्काळाचे वारंवार संकट येऊनही, प्रसंगी टँकरने पाणी आणून कारखाना चालविणाऱ्या राजेंद्रअण्णांना सभासदांनी निवडणुकीत साथ दिली.सूतगिरणीचीही यंदा प्रथमच निवडणूक झाली. भाजपच्या पडळकरांचे परिवर्तन पॅनेल आणि राजेंद्रअण्णांचे शेतकरी पॅनेल या दुरंगी सामन्यात देशमुख गटाने पुन्हा गुलाल उधळला. साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ वाचले असले तरी, सूतगिरणीच्या निवडणुकीत दोन उमेदवार वगळता इतरांचे ‘डिपॉझिट’ही जप्त झाले. या संस्थांच्या निवडणुकीत देशमुखांच्या पुढच्या पिढीतील हर्षवर्धन आणि दिग्विजय या तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी या दुष्काळी भागातील संस्थांवर निवडणुकीच्या खर्चाचा बोजा नको, म्हणून सामोपचाराने बिनविरोध निवडणुका करण्याचा कल असलेल्या राजेंद्रअण्णांनी निर्विवाद विजय मिळविला. असे असले तरी, या प्रस्थापितांशी कसलीही तडजोड न करता ठामपणे निवडणुकांना सामोरे जाणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेमुळे तालुक्याच्या राजकीय संघर्षात वाढ झाली, एवढे मात्र नक्की. तालुक्यात आलेल्या ‘टेंभू’च्या पाण्यामुळे तालुक्याबरोबर साखर कारखान्याच्या उसाचा दुष्काळही कायमचा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखाना आणि सूतगिरणीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.