शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

राजारामबापू जन्मशताब्दीची जय्यत तयारी; आज इस्लामपुरात कार्यक्रम : शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, कन्हैया कुमार यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या समारंभास राष्ट्रवादी ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रीय युवा नेता कन्हैया कुमार यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. हा कार्यक्रम राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयामागील मैदानात आज, गुरुवारी दुपारी दीड वाजता होत आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील आहेत. या समारंभास माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आ. जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार लक्ष्मण माने येणार आहेत.लोकनेते राजारामबापू पाटील लोकोत्तर नेते होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन समाजाच्या सेवेस वाहून घेतले. त्यांनी मंत्री, आमदार, प्रथम काँग्रेस व नंतर जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळून, जबाबदारी पाहताना राज्याच्या घडणघडणीत मोलाचे योगदान केले. त्यांनी सहकाराचे जाळे तालुक्यात विणून वाळवा तालुक्यास राज्यातील एक प्रगत तालुका बनविला. नव्या पिढीसमोर बापूंच्या कार्याची उजळणी व्हावी, म्हणून आम्ही वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार आहोत. त्याची सुरुवात या समारंभाने करीत असल्याचे प्रा. शामराव पाटील यांनी सांगितले.वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तीन ठिकाणी केली आहे. इस्लामपूरकडून येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी कुस्ती केंद्राच्या शेजारच्या मैदानावर पार्किंग व्यवस्था केली आहे. बोरगावकडून येणाºया चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था गाडीतळावर केली आहे, तर साखराळे गावातून येणाºया चारचाकी वाहनांसाठी साखराळेशेजारच्या बग्यास तळावर पार्किंग व्यवस्था केली आहे. तसेच दुचाकी वाहनांसाठी पेट्रोल पंप ते कँटीनपर्यंत रस्त्याच्या बाजूला, तसेच गाडीतळ ते जुन्या कँटीनपर्यंत रस्त्याच्या बाजूला पार्किंग व्यवस्था केली आहे.राजारामबापू पाटील जन्मशताब्दी समितीचे प्रा. शामराव पाटील, पी. आर. पाटील, विनायक पाटील, आर. डी. सावंत, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, सौ. सुस्मिता जाधव व पदाधिकारी या समारंभाचे संयोजन करीत आहेत.