शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रयत क्रांती संघटनेचा आलेख ढासळतोय! सदाभाऊ अस्वस्थ : भाजप-शिवसेना युतीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:03 IST

भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे

ठळक मुद्देलोकसभेच्या उमेदवारीचे काय?

अशोक पाटील ।इस्लामपूर : भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे या संघटनेचा आलेख ढासळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत अस्वस्थ आहेत.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात उदयास आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात मतभेदांमुळे वितुष्ट आले. त्यानंतर खोत यांनी शेट्टी यांना शह देण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. त्यांनी भाजपच्या आश्रयाखाली रयत क्रांती संघटनेची स्थापना केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडीचे जागा वाटप निश्चित होत आले आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे हातकणंगले मतदारसंघ देण्यात येणार आहे. त्यामुळे खा. शेट्टी यांनी आतापासूनच विरोधी उमेदवाराला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांनी आव्हान देण्यापूर्वी खोत यांनी आपणच शेट्टी यांच्या विरोधातील उमेदवार असल्याचा दावा करत संपर्क दौरे सुरू केले होते. तथापि भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेला जात असल्याने खोत नाराज झाले आहेत.

यातून रयत क्रांती संघटनेची ताकद भाजपनेच काढून घेतल्याचे चित्र आहे. खासदार शेट्टी यांच्याविरोधात खोत हेच योग्य उमेदवार असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांतून होत होता. आता मात्र त्यांच्या उमेदवारीचा दावा फोल ठरणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संघटनेचा आलेख ढासळत असल्याचे चित्र आहे.

 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली, तर खासदार शेट्टी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. तथापि युतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत जो निर्णय घेतील, तो निर्णय रयत क्रांती संघटना मान्य करेल.- सागर खोत, रयत क्रांती संघटना.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणSangliसांगली