शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

सांगलीत बेदाण्यास उच्चांकी ४७० भाव

By अशोक डोंबाळे | Updated: March 14, 2025 19:34 IST

रमजानमुळे बेदाणा दरात तेजी : बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : येथील मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो ४७० रूपये भाव मिळाला. रमेश श्रीशैल तळी असे त्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. हा दर या हंगामातील विक्रमी आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याचे बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच रमजान सणामुळे बेदाण्यास मागणी जास्त असल्यामुळे दर तेजीत आहेत.

द्राक्षाच्या मागील मार्च २०२४ च्या हंगामात दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाण्याचे उत्पादन घेतले. परिणामी गरजेपेक्षा जास्त बेदाणा उत्पादन झाल्यामुळे दर खूपच उतरले हाेते. यावर्षी द्राक्षाचे उत्पन्न घटले असून दरही चांगला आहे. द्राक्षाचे दर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट द्राक्षांची विक्री केली आहे. बेदाण्याचे उत्पादन घटले आहे म्हणून सध्या बेदाण्यास चांगला दर मिळत आहे. त्यातच रमजान महिना असल्यामुळेही देशभरातून व्यापारी बेदाणा खरेदीसाठी सांगलीत आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास प्रतिकिलो २०० ते ४७० रुपये दर मिळत आहे. बेदाण्यास सरासरी प्रतिकिलो १५० ते ३०० रुपये दर मिळत आहे, बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले.चौकट

बेदाण्याचे असे आहेत दर             दर (प्रतिकिलो)

- हिरवा बेदाणा : १३० ते २००- पिवळा बेदाणा (गोल) : १८० ते २००

- काळा बेदाणा : ७० ते ११०- हिरवा लांब बेदाणा (सुंटेखणी) : २३० ते ३५०

- काळा बेदाणा शरद : १३० ते २३०कोट

बेदाण्याचे उत्पादन कमी असल्यामुळे दरातील तेजीत कायम राहाणार आहे. रमजान महिन्यामुळे बेदाण्यास सर्वाधिक मागणी असल्यामुळे दरातील तेजी आणखी वाढली आहे. बेदाण्यास प्रतिकिलो २०० ते २५० रुपये दर स्थिर असणार आहे.- राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, बेदाणा असोसिएशन.

टॅग्स :Sangliसांगली