शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

हमाल, शेतकºयांच्या पेन्शनसाठी लढा उभारू-- बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील कष्टकरी, अंगमेहनती, हमालांसोबतच आता शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारला जाणार आहे. हमाल, शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी जेल भरो आंदोलनही करू. राज्यातील सर्व तुरूंग भरल्यावर राज्यकर्त्यांना पेन्शन द्यावीच लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केले.सांगलीत हमाल, मापाडी, ...

ठळक मुद्देसांगलीत हमाल, माथाडी कामगारांचा मेळावा; जेल भरो आंदोलनाचा इशारालोकांचे नव्हे, तर धर्माचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ल मापाडी महामंडळाचे अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी बीड येथे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील कष्टकरी, अंगमेहनती, हमालांसोबतच आता शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा उभारला जाणार आहे. हमाल, शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन मिळावी, यासाठी जेल भरो आंदोलनही करू. राज्यातील सर्व तुरूंग भरल्यावर राज्यकर्त्यांना पेन्शन द्यावीच लागेल, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केले.

सांगलीत हमाल, मापाडी, हळद महिला कामगारांचा मेळावा व ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांना गाडी प्रदान समारंभ असा संयुक्त कार्यक्रम झाला, यावेळी डॉ. आढाव बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, महामंडळाचे सहचिटणीस राजकुमार घायाळ, माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ उपस्थित होते.

आढाव म्हणाले की, आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, पण कष्टकºयांना पेन्शन नाही. हमालांना पेन्शन लागू करण्याची मागणी होत आहे. आता केवळ हमालांपुरतीच लढाई हाती घेतली जाणार नाही, तर या लढ्यात शेतकरी, शेतमजुरांनाही सहभागी करून रस्त्यावरची लढाई हाती घेतली जाईल. त्यासाठी जेलमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा. राज्यातील सर्व तुरूंग कष्टकºयांनी भरले पाहिजेत. मग पेन्शनची मागणी धुडकाविण्याची हिम्मत राज्यकर्त्यांना होणार नाही.

हमाल पंचायतीने अनेक वर्षे लढा देऊन बºयाच मागण्या मान्य करून घेतल्या. पण आता त्याच्या मुळावरच सरकार उठले आहे. जातपात, धर्म, स्त्री, पुरूष असे भेद विसरून तुम्ही एकत्र येऊन न्याय मिळविला आहे. तसाच लढा शेतकºयांनीही उभारला आहे. त्यांना केवळ कर्जमुक्ती देऊन चालणार नाही, तर शेतीमालाला हमीभाव देण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाने स्वीकारली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.पतंगराव कदम म्हणाले की, सांगली बाजार समितीत हमाल, व्यापारी, संचालक मंडळात कुठलाही तंटा नाही. त्यामुळे राज्यात सांगली बाजार समितीने पहिला क्रमांक मिळविला आहे. हमालांची पेन्शनची मागणी रास्त आहे.

शेतकºयांसोबत हमालांनाही पेन्शन मिळाली पाहिजे. सरकारला धडा शिकविल्याशिवाय ते हलत नाही. त्यामुळे हा प्रश्न धसास लावण्यासाठी सर्वांनी एकत्र पुढाकार घेऊया.बापूसाहेब मगदूम म्हणाले की, वयाच्या पंधराव्या वर्षापासून कष्टकºयांच्या लढ्यात सहभागी झालो. कष्टकºयांना पेन्शन मिळाल्याशिवाय थांबणार नाही. डिसेंबरमध्ये शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी यांची एकत्रित परिषद घेणार आहोत. राजकुमार घायाळ म्हणाले की, कष्टकºयांनी लढा देऊन जे मिळविले, ते काढून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. गोवा, राजस्थान, दिल्लीत हमालांना पेन्शन दिली जाते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला. यावेळी प्रा. शरद पाटील, दिनकरतात्या पाटील, दिलीप सूर्यवंशी, प्रशांत शेजाळ, अ‍ॅड. के. डी. शिंदे यांचीही भाषणे झाली.हमाल पंचायतीचे सचिव विकास मगदूम यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, बाजार समितीचे सचिव पी. एस. पाटील, संचालक बाळासाहेब बंडगर, गोविंद सावत, प्रल्हाद व्हनमाने, राजाराम बंडगर, श्रीमंत बंडगर, शालन मोकाशी, बजरंग खुटाळे, वसंत यमगर, बाबासाहेब गडदे उपस्थित होते.लोकांचे नव्हे, धर्माचे राज्यडॉ. बाबा आढाव यांनी केंद्र व राज्य शासनावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, लाल झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही लढा दिला. आता तोच झेंडा, समाजवाद काढून टाकण्याची भाषा केली जात आहे. लाल झेंडा गेला, तर कष्टकºयांचे काहीच चालणार नाही. सध्या देशात उलटे वारे वाहू लागले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर घाव घातला जात आहे. अन्यायाविरुद्धच्या लढ्यात जात, धर्म आडवे येत आहेत. लोकांचे नव्हे, तर धर्माचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली. बीडला अधिवेशनराज्य हमाल मापाडी महामंडळाचे अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर रोजी बीड येथे होत आहे. या अधिवेशनाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पणनमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.