शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या दरबारी सांगलीचा पाऊस भारी!

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

म्हणे, जादा पावसाचा जिल्हा! : ७६ ते १०० टक्के गटात समावेश

अंजर अथणीकर / सांगली मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्यात ७६ ते १०० टक्के पाऊस नोंदला गेला. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये मात्र सरासरीच्या तुलनेत ६९ टक्केच पाऊस झाला आहे. शासन दरबारी नोंदवलेल्या पावसावरच आता नियोजन होणार असल्यामुळे याचा फटका जिल्ह्यातील उपाययोजनांना बसणार आहे. शासनाकडून ७६ ते १०० टक्के पाऊस झालेल्या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याबरोबरच धुळे, नंदुरबार, अहमनगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया या तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६९.४ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४२ टक्क्याहून कमी पाऊस यंदा झाला आहे. ऐन पावसाळ्यात सध्या ५० हून अधिक टँकर सुरु आहेत. जिल्ह्यातील यावर्षी आटपाडी वगळता एकाही तालुक्याने सरासरी ओलांडलेली नाही. सर्वाधिक सरासरी पावसाची नोंद आटपाडी तालुक्यात झाली आहे. या तालुक्याची सरासरी ३५५ मि. मी. असून, प्रत्यक्षात २९५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडीची सरासरी टक्केवारी १००.३ टक्के आहे. त्याखालोखाल खानापूर व शिराळा या दोन तालुक्यात पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात सरासरी ६४.२ व ६४ टक्के पाऊस बरसला आहे. वाळवा, तासगाव व कवठेमहांकाळ या तीन तालुक्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. शिराळा तालुक्यातही यंदा पाऊसमान कमी आहे. सर्वात कमी पावसाची नोंद वाळवा तालुक्यात झाली आहे. भीषण पाणीटंचाई : टंचाई आराखडा वाढला जिल्ह्यात सरासरी कमी पाऊस झाल्यामुळे जत, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांचा १३ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे विद्युत बिल भरण्यासाठी नऊ कोटींची आणि टँकर, विहिरी व कूपनलिका अधिग्रहण करण्यासाठी चार कोटींच्या निधीची गरज आहे. संभाव्य टँकर ८० हून अधिक लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.