शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

अमरापूरच्या पुलावर पावसाने गुडघाभर पाणी

By admin | Updated: June 15, 2015 00:20 IST

काम निकृष्ट : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नेवरी : विजापूर-कऱ्हाड राज्यमार्गावरील अमरापूर (ता. कडेगाव) गावालगत येरळा नदीवरील पुलावर पहिल्याच पावसात गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांची त्रेधा उडाली. नवीन पुलावरच पाणी साचल्याने वाहनधारक कसरत करत होते. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याची चर्चा असून, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी अमरापूरला येरळा नदीवर पुलाचे काम सुरू होते. त्यावेळेस निकृष्ट कामाबदल संबंधित खात्याकडे तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली होती. ठेकेदाराने घाईघाईत हे काम पूर्ण केले होते. अद्याप पावसाला सुरुवात झाली नसली तरी, पहिल्याच पावसात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांनी डोक्याला हात लावला. पुलावरील खड्डेही तसेच आहेत. साचलेल्या पाण्यातून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांची तारांबळ उडताना दिसत आहे. सध्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांचे हाल होत आहेत. या कामाची सखोल चौकशी करून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा, अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे. (वार्ताहर)