शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
4
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
5
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
6
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
7
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
8
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
9
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
10
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
11
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
12
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
13
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
14
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
15
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
16
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
17
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
18
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
19
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
20
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा

जत तालुक्यात दारू अड्ड्यांवर छापे

By admin | Updated: April 15, 2015 00:27 IST

तिघांना अटक : शेगाव, डफळापूर, सिंदूर, अंकले येथे भरारी पथकाची कारवाई

सांगली : जत तालुक्यातील सिंदूर, शेगाव, डफळापूर, अंकले येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापे टाकले. या छाप्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हातभट्टीची तयार दारू, कच्चे रसायन, तसेच देशी दारूचा साठा असा एकूण ४७ हजारांचा माल जप्त केला आहे. निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती अधीक्षक प्रकाश गोसावी यांना मिळाली होती. त्यांनी भरारी पथकास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक रावसाहेब कोरे, दुय्यम निरीक्षक इंद्रजित कोलप, रामभाऊ पुजारी, रणधीर पाटील, इरफान शेख, करण सर्वदे, अर्जुन कोरवी, सुवास पोळ, संतोष बिराजदार, सचिन जाधव, संजय गोडसे, अमित पाटील, वैभव पवार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे एकाचवेळी सिंदूर, शेगाव, डफळापूर, अंकले या चार गावांतील दारू अड्ड्यांवर छापे टाकले. छाप्याची चाहूल लागल्याने अनेकांनी पलायन केले. पण शिवानंद बसाप्पा हिप्परगी (वय २२), इराप्पा पवाडी हिप्परगी (२३, सिंदूर) व सचिन विलास निकम (२९, शेगाव) हे तिघे सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून पथकातील कर्मचारी जत तालुक्यात कुठे हातभट्टीचे अड्डे सुरू आहेत, याची माहिती घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना या चार गावात अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही कारवाई केली. (प्रतिनिधी)