शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

भिलवडीसह चार गावांत छापे

By admin | Updated: January 9, 2017 00:13 IST

ंू संशयितांची धरपकड : शंभरजण ताब्यात; मुलीच्या खूनप्रकरणी तपास गतीने

सांगली/भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथे १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रविवारी दिवसभर भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन व खंडोबाचीवाडीत छापे टाकले. शंभर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नव्हती.माळवाडीतील मुलीचा चार दिवसांपूर्वी अत्याचार करून खून केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचा जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. गावे बंद ठेवली जात आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे तपासासाठी माळवाडीत तळ ठोकून आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथकानेही या तपासात उडी घेतली आहे. सध्या चार संशयित ताब्यात आहेत; मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. हे चौघे मृत मुलीची छेड काढत होते. मुलीच्या चुलत भावाने त्यांना समजही दिली तपासात विविध मुद्दे निर्माण करुन त्यांची चौकशी केली जात आहे. रविवारी दिवसभर पोलिसांनी भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी या गावात छापे टाकले. शंभरभर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रत्येक संशयिताचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, घटनेदिवशी तो कुठे होता? याची माहिती घेतली जात आहे. पीडित मुलगी गुरुवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर तिला कोणी पाहिले होते का? तिच्यासोबत आणखी कोण होते का? याची माहिती घेतली जात आहे. चौकशीतून जी काही माहिती मिळेल, त्याआधारे तपासाला दिशा दिली जात आहे. मात्र अजूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही. परंतु याचा छडा लाऊन संशयितांना अटक करण्यात यश येईल, असे पोलिस सांगत आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, निषेधघटनेच्या निषेधार्थ रविवारी तासगाव, डफळापूर (ता. जत), नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, तर कुपवाड येथे संशयितांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. उद्या जिल्हा ‘बंद’चे आवाहन : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उद्या, मंगळवारी जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा वगळून अन्य सर्व घटकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खटला जलदगती न्यायालयात : रहाटकर माळवाडी येथे १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून केल्याची घटना गंभीर व निंदनीय आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, अशी माहिती विजया रहाटकर यांनी रविवारी सांगलीत दिली.