शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

जिल्ह्यात पुन्हा वाळूसाठ्यांवर छापे; पावणेचार कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजत/आटपाडी/कवठेमहांकाळ : महसूल विभागाने रविवारी पुन्हा बेकायदेशीर वाळूसाठ्यांवर छापा टाकून तस्करांवर कारवाई केली. जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ येथे झालेल्या कारवाईत एकूण ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.जत तालुक्यातील संख, खंडनाळ, करजगी व हळ्ळी बोर नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कजत/आटपाडी/कवठेमहांकाळ : महसूल विभागाने रविवारी पुन्हा बेकायदेशीर वाळूसाठ्यांवर छापा टाकून तस्करांवर कारवाई केली. जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ येथे झालेल्या कारवाईत एकूण ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.जत तालुक्यातील संख, खंडनाळ, करजगी व हळ्ळी बोर नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून साठा केलेली सुमारे ४४६ ब्रास वाळू महसूल विभागाने जप्त केली आहे. याप्रकरणी २७ वाळू तस्करांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ११ लाख ३१ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तीन ते दहा सप्टेंबरअखेर ही कारवाई करण्यात आली आहे.हळ्ळी गावात ९४ ब्रास वाळू साठा जप्त करून जंगाप्पा सातपुते, चंदू कोळी, बसवराज पाटील, राजकुमार सातपुते, अरविंद खवेकर, संपत खवेकर, राजू मुदीमणी (सर्व, रा. हळ्ळी) या सातजणांना नोटीस देण्यात आली आहे. करजगी गावात ६४ ब्रास वाळू साठा जप्त करून जयवंत कलबुर्गी, शाबू पट्टणशेट्टी, निंगाप्पा जेऊर, महादेव पट्टणशेट्टी, अशोक दळवाई, सुरेश रवी सर्व (सर्व रा. करजगी) या सहाजणांना नोटीस देण्यात आली आहे. संख व खंडनाळ परिसरात २८८ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. विठ्ठल लोहार, हणमंत पाटील, अंबू बसर्गी, श्रीशैल कलादगी, शांतू गुजरे, अनिल बिराजदार (सर्व रा. संख) व श्रीशैल वज्रशेट्टी, सुरेश पाटील, तम्मा कुलाळ, दत्ता पाटील, भारत टेंगले, सुरेश मोटे, विठ्ठल सरजे व वाघोली (पूर्ण नाव नाही) सर्व रा. खंडनाळ या चौदाजणांना नोटीस देण्यात आली आहे.जत परिसरात सुरू असलेल्या बांधकामांची चौकशी करून ३२५ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. याप्रकरणी २० ते २५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. पाच गावातील एकूण ७७१ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. त्यापैकी काही वाळूचा लिलाव करून सहा लाख ९२ रुपयाचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला आहे. या कारवाईत प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार ए. बी. भस्मे, मंडल अधिकारी नंदकुमार बुकटे, अरुण कणसे व गाव कामगार तलाठी आर. एच. कोरवार, गणेश पवार, विशाल उदगिरे यांनी भाग घेतला होता.रविवारी दिवसभर तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी आणि तलाठी यांना एकत्रित करुन आटपाडीतील २८ बांधकामांचे पंचनामे केले. याठिकाणी १ कोटी १ लाख १० हजार ९६० रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.बोंबेवाडी येथे शुक्रवारी रात्री वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर आठ वाळू तस्करांनी हल्ला केला. त्यामध्ये सुरेश किसन शेळके (पुरवठा विभाग-अव्वल कारकून) आणि लिपिक संजय सोनुले हे दोन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन लंगुटे यांनी रविवारी आटपाडीतील सर्व सुरु असलेल्या बांधकामांचे पंचनामे केले. त्यासाठी तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी आणि गावकामगार तलाठी यांना एकत्र करण्यात आले. दिघंची रस्ता ते निंबवडे रस्त्याच्या उत्तरेकडील एक भाग, दिघंची रस्ता ते सांगोला चौकापर्यंत पूर्वेकडील एक भाग आणि उर्वरित बसस्थानक परिसर असे तीन विभाग करुन, सर्व सुरु असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी जाऊन पंचनामे करण्यात आले.बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या वाळूसाठ्याचे पंचनामे पथकाने केले. एका ब्रासला २७१८० रुपये एवढा दंड करण्यात येणार आहे. या कारवाईत मंडल अधिकारी ए. बी. साळुंखे, तलाठी माणिकराव देशमुख, वसंत पाटील, जीवन माने, व्ही. आर. कोळी, एस. एस. कारंडे, एम. एन. पाटोळे, एस. आर. तांबोळी, व्ही. आर. जाधव, एन. आर. पाटील, एस. एस. महाजन, पी. एन. आडसुळे, पी. एस. वायदंडे, आर. एस. वीर, एस. बी. चिप्रे, के. एस. भिंगारदेवे, यु. व्ही. जानकर, एस. एच. केंगार, डी. एम. क्षीरसागर, आर. एस. कांबळे, यू. बी. बोथिंगे, व्ही. बी. पाटील, जे. एन. माने यांनी सहभाग घेतला.महसूल कर्मचाºयांचे काम बंदमहसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटना यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन दिले. त्यामध्ये शुक्रवारी महसूल कर्मचाºयांना मारहाण करण्याºया वाळू तस्करांना अटक होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आरोपींना अटक केली नाही, तर सोमवारपासून सर्व महसूल कर्मचारी आणि तलाठी काम बंद करणार आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार बी. एम. सवदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.