शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रे चावलेय?, इंजेक्शन पाहिजे? आधी तुमचे गाव कोणते सांगा!

By संतोष भिसे | Updated: July 16, 2024 17:11 IST

मिरज : कुत्रे चावल्यास त्यावर तातडीने उपचार आवश्यक आहेत. मात्र, महापालिका क्षेत्रातील रहिवासी असाल, तरच रेबीजचे इंजेक्शन मिळेल असा ...

मिरज : कुत्रे चावल्यास त्यावर तातडीने उपचार आवश्यक आहेत. मात्र, महापालिका क्षेत्रातील रहिवासी असाल, तरच रेबीजचे इंजेक्शन मिळेल असा फंडा महापालिकेने सुरु केला आहे. या नियमामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. कुत्रे चावलेले अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत.कुत्रे चावल्यास रुग्णास सर्वप्रथम शासकीय रुग्णालयात पहिली दोन इंजेक्शन्स घ्यावी लागतात. नंतर आणखी चार किंवा पाच इंजेक्शन्सची गरज असते. महापालिका रुग्णालयात ती मिळतात. पण त्यासाठी रुग्णाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला अशा कागदपत्रांची रहिवासी पुरावा म्हणून मागणी केली जाते. यापैकी काही नसेल, तर आमदारांचे पत्र आणण्यास सांगितले जाते. ही कागदपत्रे किंवा पत्र मिळेपर्यंत इंजेक्शन दिले जात नाही. रुग्णाची हेळसांड होते. मिरजेत कुत्रे चावलेल्या दोन वर्षांच्या बालकास घेऊन आलेल्या महिलेस परत पाठविण्यात आले. मुलगा स्थानिक रहिवासी नसल्याने इंजेक्शन नाकारण्यात आले. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयात तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांच्या अडवणुकीबद्दल जाब विचारण्यात आला. महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत तसा ठराव केल्याने अंमलबजावणी बंधनकारक असल्याचे सांगितले. 

प्रथम मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करामहापालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीची गरज आहे. मात्र, त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. तिन्ही शहरात फलक लावून भटक्या कुत्र्यांनी केवळ महापालिका क्षेत्रातील रहिवाशालाच चावा घ्यावा, अन्यथा प्रशासन जबाबदार राहणार नाही, अशा सूचनेचे फलक लावण्याची मागणी मोहन वाटवे यांनी प्रशासनाकडे केली आहे. रुग्णावर उपचारासाठी महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करणारे अधिकारी इतर जनहिताच्या ठरावांच्या अंमलबजावणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

कुत्रा चावलेली व्यक्ती परगावातील, परराज्यातील असेल आणि त्याच्याकडे कागदपत्रे किंवा लोकप्रतिनिधीचे पत्र नसेल, तर त्याच्या जीवाशी महापालिका खेळ करीत आहे. मानवता आणि रुग्णसेवा या भावनेने प्रत्येक रुग्णावर उपचार झालेच पाहिजेत. हा अन्यायी ठराव तातडीने रद्द करावा. - मोहन वाटवे,  जिल्हा सरचिटणीस, भाजप

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्रा