शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-तुंग रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:56 IST

सांगली : मरणयातनांचा अनुभव देणाऱ्या सांगली-तुंग या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा पेटला असून, विविध सामाजिक संघटनांनी याविषयी संताप व्यक्त ...

सांगली : मरणयातनांचा अनुभव देणाऱ्या सांगली-तुंग या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा पेटला असून, विविध सामाजिक संघटनांनी याविषयी संताप व्यक्त केला. मंत्री, खासदार, आमदार तसेच जबाबदार अधिकाºयांच्या कुटुंबियांनीच आता याप्रश्नी संबंधितांना जाब विचारावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचतर्फे करण्यात आले आहे.‘लोकमत’ने या रस्त्याच्या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर नेते, अधिकारी खडबडून जागे झाले. नागरिक जागृती मंचने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. शेवटी या गोष्टीची दखल घेत शासनाला हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट करावा लागला. रस्त्याचे तीन टप्प्यातील काम सुरू होते. दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी, सांगली-तुंग हा पट्टा अद्याप दुरुस्त झालेला नाही. प्रचंड नरकयातना सहन करीत प्रवासी या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेत अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रस्ते कामास तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय झाला.भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी या रस्तेकामाचा नारळ थाटात फोडला. त्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन निधी आणल्याचा गाजावाजा केला. उद्घाटनानंतर दुसºयादिवशी लगेच कामास सुरुवात होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र या रस्त्याने त्यानंतर ना खडी पाहिली ना डांबर. होते ते खड्डे अधिकच अक्राळ-विक्राळ रूप धारण करीत आहेत.सुरुवातीला पॅचवर्क करून, महिनाभर पावसाळ्यासाठी प्रवाशांची सोय करण्यात येईल, त्यानंतर मंजूर निविदेप्रमाणे साडेसहा कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पॅचवर्क सुरू झाले.पॅचवर्क झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुख्य कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घाईगडबडीत भाजप नेत्यांनी आटोपला, पण त्यानंतर त्याची सुरुवात झाली की नाही, हे पाहण्याची तसदीही घेतली नाही.वाहनाचे चाक तुटलेसांगलीतील संतोष माळी हे शनिवारी सांगली-तुंग रस्त्यावरून कारने जात होते. त्यावेळी खड्ड्याचा दणका बसल्याने कारचे चाक तुटून सात फुटावर जाऊन पडले. या अपघातात ते थोडक्यात बचावले. नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी याविषयी संताप व्यक्त करताना, या अपघाताची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली आहेत.पावसाळाही संपला..!इतके महिने केवळ पावसाळा असल्याने काम करता येत नसल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत होते. आता शासकीय दप्तरी पावसाळा संपल्यानंतरही त्यांना हे काम सुरू करता आले नाही. आता कोणते कारण ते देणार आहेत, असा सवाल संघटनांच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे.