शिराळा : गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. ते देत शिक्षकांनी बालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात तालुका शिक्षक संघाच्यावतीने आयोजित ‘कोविड योद्धा’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात होते. जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, वैशाली माने, उपसभापती बी. के. नायकवडी, अविनाश गुरव, पोपटराव सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील शिक्षक अनंत अडचणींना तोंड देत गुणवत्ता टिकवून आहेत. तालुक्यातील शाळा आणि शिक्षक यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
संभाजीराव थोरात म्हणाले, शिक्षकांना चिंतामुक्त करण्यासाठी शिक्षक संघ नेहमीच संघर्ष करत आहे. शिक्षण सेवकांचे प्रश्न असोत अथवा बदली धोरण असो, प्रत्येकवेळी शिक्षक संघाने शिक्षकहिताची भूमिका घेतली आहे.
विनायकराव शिंदे, बाबा परीट यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, दीपक नागवेकर, फत्तेसिंग पाटील, अशोक घागरे, मोहन पवार, प्रकाश जाधव, संजय पाटील, सी. एम. पाटील, अनंत सपकाळ, आर. सी. पाटील, प्रकाश यादव, पौर्णिमा पवार आदी उपस्थित होते.
फोटो-१४शिराळा१
फोटो ओळी :
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सेवा केंद्रात तालुका शिक्षक संघाच्यावतीने आयोजित ‘कोविड योद्धा’ पुरस्कार वितरण आमदार मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संभाजीराव थोरात उपस्थित होते.