लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरमच्या राज्य कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून प्रा. भीमराव धुळूबुळू यांची निवड झाली. नाशिकमध्ये संघटनेच्या बैठकीत निवड झाली. बैठकीत संघटनेसमोरील आव्हाने, समस्या व दिशा या विषयावर चर्चा झाली. अध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार, प्रा. संजय कुलकर्णी, अॅड. यशवंत बोरसे, प्रा. प्रताप गस्ते, प्रा. सुनील पिंपळकर, प्रा. नीलकंठ पाटील आदींनी मार्गदर्शन केले. स्वागत प्रा. फैसल पटेल यांनी, तर प्रास्ताविक प्रा. विजय दोशी यांनी केले.
कोचिंग क्लासेस व्यवसायाकडे व शिक्षण क्षेत्राकडे सरकारच्या दुर्लक्षाविरोधात एक दिवसीय धरणे आंदोलनाचा निर्णय झाला. कोचिंग क्लासेसना शिक्षण व्यवस्थेचा एक भाग समजून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करून लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची मागणीही झाली. बैठकीला सांगलीतून प्रा. प्रताप गस्ते, प्रा. सुधाकर सावंत, प्रा. रवी बावडेकर आदी उपस्थित होते.