शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

पलूस तालुक्याला अवकाळीचे ग्रहण!

By admin | Updated: March 23, 2015 00:38 IST

क्षारपड जमिनीच्या क्षेत्रात वाढ : चौदा हजार एकरातील द्राक्षबागा भुईसपाट

आर. एन. बुरांडे - पलूस -संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला, तरी कृषिसंपन्न आणि सधनतेची दैवी देणगी लाभलेला कृष्णा-येरळा यांच्या कुशीतील पलूस तालुका मात्र दुष्काळापासून नेहमीच कोसोदूर राहिलेला आहे. परंतु अलीकडे मात्र अवकाळी पाऊस आणि क्षारपड जमिनीमुळे पलूस तालुक्यालाही ग्रहण लागले आहे.कृष्णा-येरळा या नद्यांच्या कुशीतील पलूस तालुक्यात खासगी आणि सहकारी पाणी योजनांमुळे शेत शिवाराची इंच न् इंच जमीन ओलिताखाली आली आहे. त्यातून फुललेली समृध्दीची हिरवळ हे पलूस तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. तालुका ३४ गावांचा आहे. पैकी एक, दोन गावांचा अपवाद वगळता उरलेली सर्व गावे कृषिसंपन्न आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ २७४४५.८३ हेक्टर आहे. पैकी लागवडीखालील क्षेत्र २४६९६ हेक्टर आहे, तर बागायती क्षेत्र १८११३.५५ हेक्टर आहे आणि कोरडवाडू क्षेत्र केवळ ६५८० हेक्टर आहे. तालुक्यात प्रामुख्याने ऊस, द्राक्षे, सोयाबीन, ज्वारी,गहू, हरभरा, मका, हळद, भुईमूग, केळी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. लहानशा या तालुक्यात द्राक्षशेती १४ हजार एकरावर केली जाते. पलूस तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४८०.२ इतके आहे. मात्र बारमाही प्रवाहित कृष्णा नदीमुळे आणि शेती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याने तालुक्यातील भूजल पातळी बाराही महिने समाधानकारक असते. तालुक्यात एकसुध्दा धरण नाही अथवा तलाव नाही. तरीसुध्दा तालुका कृषिसंपन्न झाला आहे.शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, शेडनेटच्या साहाय्याने फूलशेती, फळभाजी याशिवाय चाऱ्याच्या मुबलकतेमुळे पशुधनसुध्दा मोठे आहे. अशा या समृध्द पलूस तालुक्याला आता अवकाळी पावसाने अक्षरश: धुऊन काढले आहे. १४ हजार एकरावरील द्राक्षशेती फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. बागांचा एकरी खर्च वाढला आहे. शासनाच्या पंचनाम्याचे किचकट निकष यामुळे बागायतदारांना भरपाई देण्यात अडचणी येत आहेत. या अवकाळीमुळे बेदाण्याचा दर्जा खालावला आहे. रब्बी पिकांपैकी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकरी अक्षरश: हबकला आहे. बेभरंवशाची शेती करण्यापेक्षा अन्य शेतीकडे वळण्याचा शेतकऱ्यांचा कल दिसून येऊ लागला आहे. तालुक्यातील अवकाळीमुळे पीकनिहाय बाधित झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे- द्राक्षे ३०८.७६, गहू १०.९०, ज्वारी २३.२१, हरभरा २०.२३२, हळद १.८०.कृषिसंपन्न पलूस तालुक्याचे अवकाळी पाऊस मोठे नुकसान करीत असताना, पाण्याच्या अतिवापराने आणि शेतीच्या पारंपरिक पध्दतीमुळे तालुक्याला क्षारपडचा प्रश्न तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, वसगडे, आमणापूर, दुधोंडी, पुणदी, नागराळे, धनगाव गावांना सतावू लागला आहे. तालुक्यात क्षारपडचे क्षेत्र ६८२४.४४ हेक्टर एवढे आहे. यात हळूहळू वाढ होत आहे. या कृषिसंपन्न तालुक्याला अवकाळीने आणि क्षारपड प्रश्नाने जेरीस आणले आहे. तालुक्यातील शेतकरी मात्र हतबल झाला आहे. अवकाळीमुळे बेदाण्याचा दर्जा खालावला आहे. रब्बी पिकांपैकी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवकाळीमुळे द्राक्षाचे ३०८.७६, गहू १०.९०, ज्वारी २३.२१, हरभरा २०.२३२, तर हळदीचे १.८० हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. बागांचा एकरी खर्च वाढला आहे. शासनाच्या पंचनाम्याचे किचकट निकष यामुळे बागायतदारांना भरपाई देण्यात अडचणी येत आहेत.