शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पलूस-कडेगावची पोटनिवडणूक ताकदीने लढविणार : पृथ्वीराज देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:18 IST

कडेगाव : राज्यातील अनेक पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध करण्याचे संकेत काँग्रेस ने पाळलेले नाहीत. त्यामुळे आता पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध न करता ताकदीने लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, असे प्रतिपादन भाजप चे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ...

ठळक मुद्देसंग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कडेगाव : राज्यातील अनेक पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध करण्याचे संकेत काँग्रेसने पाळलेले नाहीत. त्यामुळे आता पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध न करता ताकदीने लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक,आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, अतुल भोसले, राजाराम गरुड उपस्थित होते.

पृथ्वीराज देशमुख पुढे म्हणाले, ही निवडणूक ताकतीने लढवायची असून कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून प्रचार करावा. पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपची जिल्ह्यातील अखंड टीम सक्रिय होणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात एक मंत्री प्रचार सभा घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संजय पाटील म्हणाले, संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी मिळाली आणि त्यांनी पारदर्शक व कुशल कारभारातून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता ताकदीने व जिद्दीने निवडणूक लढवून विजय खेचून आणण्याचा निश्चय भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.संग्रामसिंह देशमुख म्हणाले, सर्वसामान्य जनता आणि भाजपने मला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी दिली. या संधीचे सोने करीत जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व आदर्शवत केला. आता विधानसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. कार्यकर्त्यांवर आमचा भरोसा आहे. आमचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करतील, पण भाजपचा आमदार करतील.

शिवाजीराव नाईक म्हणाले, संग्रामसिंह देशमुख यांची कार्यकुशलता राज्यस्तरावरील नेत्यांच्या डोळ्यात भरली. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आता तुम्ही फक्त अर्ज भरा, बाकी सर्व जबाबदारी नेते आणि कार्यकर्ते सांभाळतील.

यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, गोपीचंद पडळकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख, धनंजय देशमुख आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ ,विक्रम पाटील,माजी आमदार भगवानराव साळुंखे ,भाजप नेते अतुल भोसले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मकरंद देशपांडे,पक्ष निरीक्षक रवी अनासपुरे ,प्रसाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले. 

 

 

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक