शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भाजपला सत्तेवरून खाली खेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:20 IST

पलूस : भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरत आहे. ते सामान्यांचे नसून, धनदांडग्यांचे आहे. त्यांना सत्तेतून खाली खेचणे आवश्यक ...

पलूस : भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरत आहे. ते सामान्यांचे नसून, धनदांडग्यांचे आहे. त्यांना सत्तेतून खाली खेचणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी व्यक्त केले. पलूस येथे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने काढलेल्या मोर्चामध्ये ते बोलत होते.ते म्हणाले, इंधनाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने कुटुंबाचा कणाच मोडला आहे. गृहिणींना घरातील मासिक ताळेबंद सावरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हीच परिस्थिती शेतीच्याबाबतीतही आहे. एकीकडे शासन शेतीसाठी शाश्वत धोरण राबवू असे म्हणते आणि दुसरीकडे खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. विजेची चोरी ही सर्वतोपरी शेतकºयांच्या माथी मारली जात आहे. शासनाची कर्जमाफी शेतकºयांसाठी नसून, बँकांची वसुली होण्यासाठी केली होती, असे चित्र आहे.शासनाचा नोटाबंदीचा निर्णयही फसला आहे. एकीकडे शासन म्हणते वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि दुसरीकडे या दिवसातही शेतकºयांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. अन्न सुरक्षा कायद्याखाली सामान्य लोकांना रेशन दुकानातून स्वस्त धान्य बंद करण्याचा डाव आहे. सामान्यांना खायला अन्न लागते, पैसा नाही, हे शासन विसरत आहे. एकंदरीत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय पूर्णत: अडचणीत आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेंद्र पोळ यांना दिले आहे. याबाबत काही निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध केला.जि. प. सदस्य शरद लाड, नंदाताई पाटील, अरुण जाधव, पूजा लाड, पं. स. उपसभापती अरुण पवार, मंगल भंडारे, पक्षनिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष भरत देशमुख, सुरेश चव्हाण, तानाजी मोकाशी, पोपट संकपाळ, राजाराम पाटील (बुर्ली), मारुती चव्हाण, दिलीप पाटील, ज्ञानेश पाटील, कुंडलच्या सरपंच प्रमिला पुजारी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला यावेळी उपस्थित होत्या.