खानापूर शहरास कोरोनाचा धोका वाढतो आहे. खानापूर शहरात ७ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष तुषार मंडले यांनी दिली.
खानापूर तालुक्यात कोरोनाबधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कार्यालयात प्रांताधिकारी संतोष भोर, उपविभागीय पोलीस अधीक्षक अंकुश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खानापूर शहरात जनता कर्फ्यू लावण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. तहसीलदार हृषीकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, जिल्हा परिषद माजी सदस्य सुहास शिंदे, मुख्याधिकारी आश्विनी माने-पाटील, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधीक्षक अंकुश इंगळे यांनी जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. खानापूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी बांधकाम सभापती उमेश धेंडे, नगरसेविका डॉ. वैशाली हजारे, रायसिंग मंडले, राजेंद्र टिंगरे, बबन माने, सदाशिव भगत, किराणा व्यावसायिक प्रवीण टिंगरे, ओंकार कोरे, तुकाराम जाधव, पंकज शेटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.