शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-शोले स्टाईल दुचाकीवरून करोनाबाबत जनजागृती, दीपक चव्हाण यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:55 IST

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून जनजागृती सुरू केली आहे.

ठळक मुद्देशोले स्टाईल दुचाकीवरून करोनाबाबत जनजागृती दीपक चव्हाण यांचा उपक्रम

सांगली : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून जनजागृती सुरू केली आहे.

आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत दीपक चव्हाण यांनी आपल्या शोले दुचाकीचा करोना जनजागृती शुभारंभ केला.  या शोले दुचाकीवर गब्बर सिंग, जय, बसंती, बिरू यांच्या प्रतिकृती करोनाबाबत संदेश देत आहेत. याचबरोबर जिल्हा प्रशासनाचा करोनाबाबतचा जनजागृती संदेशही याव्दारे देण्यात आला आहे.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत शोले स्टाईल दुचाकीवरून सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेली जनजागृती अत्यंत स्तुत्य असून सर्व नागरिकांनी याला भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

दीपक चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक आपत्ती तसेच शासनाच्या योजनांचे शोलेस्टाईल प्रबोधन आणि जनजागृती केली आहे. आता दीपक चव्हाण यांनी करोना विषाणूपासून जनतेने कसे दूर राहायचे तसेच काय काळजी घ्यावी याबाबतची प्रबोधन आपल्या शोले दुचाकीवरून सुरू केले आहे.

दीपक चव्हाण यांचे हे 36 वे प्रबोधन आहे. दीपक चव्हाण यांच्या या उपक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी शुभेच्छा दिल्या. 

सांगली शहरात दीपक चव्हाण यांचा करोना जनजागृती शोले स्टाईल रथ प्रबोधन करत फिरणार आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी चित्रपटाच्या चालीवर करोना प्रबोधन गीतही तयार केले असून ते गीत सोशल मीडियावर लोकप्रिय बनले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली