लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : जोंधळखिंडी (ता. खानापूर) येथील जय हनुमान कुस्ती तालमीस सीमा रवींद्र शिंदे यांच्या स्मरणार्थ येथील रवींद्र शिंदे, पै. मिलिंद शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी १० गुंठे जागा विनामोबदला दिली. त्याबद्दल या तिघांचा सत्कार देवदत्त राजोपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राजोपाध्ये म्हणाले की, जोंधळखिंडीसारख्या अतिग्रामीण भागात जय हनुमान तालिमीने लाल मातीशी इनाम राखले आहे. तालमीची ख्याती भारतात झाली आहे. भविष्यात येथील मल्ल देशात चमकतील.
तालमीचे कुस्ती प्रशिक्षक संजय अवघडे म्हणाले की, ग्रामीण भागात सुविधा नसल्याने काही मल्लांना प्रशिक्षित करताना अडचणी येत असल्या तरी आता हजारो हात मदतीसाठी पुढे येत आहेत. शिंदे कुटुंबीयांनी तालमीस दिलेल्या जागेत लवकरच अद्ययावत व सर्व सोयींनीयुक्त लाल मातीची तालीम उभी करणार आहे.
यावेळी आदर्श माजी सरपंच सुशांत देवकर, लेंगरेचे माजी सरपंच प्रशांत सावंत, किशोर अवघडे उपस्थित होते.
शिवानी सुतारने प्रास्ताविक केले. गौरी शिंदेने आभार मानले.