शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:29 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता घेण्यात येत आहे, असे सांगून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्व रूग्णांलयामधून सर्वसामान्य गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्यासांगली महानगरपालिकेच्या रूग्णालयाचे उद्घाटन

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता घेण्यात येत आहे, असे सांगून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्व रूग्णांलयामधून सर्वसामान्य गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी नवीन 10 प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी निधी उपलब्ध होवून 50 हजार लोकसंख्येकरिता एक या प्रमाणे 10 प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत. यातील विश्रामबाग सांगली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आजारपणामध्ये रूग्णांना डॉक्टरांचा खूप मोठा आधार असतो. त्यामुळे रूग्णांशी आपुलकीने संवाद साधा. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे याची जाणीव ठेवून त्यांना सेवा द्या असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आजारपणामध्ये उपचार करण्याबरोबरच माणसे आजारीच पडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृतीही करा. आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गोरगरीबाला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही खूप मोठ्या प्रमाणावर गरजूंना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व योजनांचा गरजूंना लाभ मिळवून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.खासदार संजय पाटील म्हणाले, केंद्र शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी 10 कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे या क्षेत्रातील गोरगरीबांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रानी सांगली सिव्हील हॉस्पीटलचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रूग्णांना सेवा द्यावी.महापौर संगीता खोत यांनी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या 10 पैकी 8 प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत 2 आरोग्य केंद्रांचे कामही लवकरच पूर्ण होईल असे सांगून या सर्व आरोग्य केंद्रामधून परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत नागरिकांना मोफत बाह्यरूग्ण सेवा, बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, संदर्भ सेवा, गरोदर माता व 0 ते 5 वयोगटातील बालकांची तपासणी व औषधोपचार, साथरोग सर्व्हेक्षण व उपचार, सामान्य प्रयोगशाळा तपासणी सुविधा, किरकोळ औषधोपचार, कुटूंब कल्याण शस्त्रक्रीया मार्गदर्शन व सल्ला, कुटूंब नियोजन पध्दती मार्गदर्शन, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जिवनसत्व अ व जंतनाशक मोहीम, कुटूंब कल्याण कार्यक्रम, आरोग्य विषयक सल्ला केंद्र, किशोरवयीन मुलामुलींना सल्ला व मार्गदर्शन, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आदि सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत.प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार संजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली