शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मागेल तेथे चारा छावण्या द्या

By admin | Updated: March 21, 2016 00:38 IST

चंद्रकांत पाटील : तालुक्यात दोन दिवसात दुष्काळ जाहीर करणार

आटपाडी : मागे चारा छावण्या हा काहींचा व्यवसाय झाला होता. पण अधिकाऱ्यांनी आवश्यकता पाहून, पडताळणी करून मागेल तिथे चारा छावणी द्यावी. आटपाडी तालुक्यातील रब्बी हंगामाची आणेवारी कमी असल्याने दोन दिवसात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करू. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आटपाडी तालुका टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ या योजनेच्या माध्यमातून ५ वर्षांत ३३ हजार गावे पूर्ण करणार आहे. अधिकाऱ्यांनी या कामांमध्ये भ्रष्टाचार न करता पुण्याईचे काम म्हणून काम केले पाहिजे. मंदिराच्या पैशात भ्रष्टाचार करावा, असं जसं पुजाऱ्याला वाटणार नाही, तितक्या पवित्रतेने दुष्काळ हटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेची कामे करावीत. ती कामे निकृष्ट करू नयेत. या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. वर्षभरात १४०० कोटींची कामे झाली. या कामांमध्ये १४ हजार कोटी खर्चून धरणे बांधली असती. त्यापेक्षा मोठं काम झालं. खासगी कंपन्यांकडूनही निधी उपलब्ध करून या योजनेला देत आहोत.आमदार अनिल बाबर म्हणाले, सध्या चारा टंचाई आहे. ३१ मार्चपासून जनावरांसाठी छावण्या सुरू करा. टेंभू योजनेच्या पाण्यामुळे तालुक्यात टँकर कमी आहेत, ही अवस्था आहे. आम्ही फुकट पाणी अजिबात मागणार नाही. हा हत्ती आहे, एकदा बसला की पुन्हा तो उठणार नाही. पण या भागात १५ आॅगस्टनंतर पाऊस येतो. टेंभू योजनेच्या पाण्याचे ४ महिन्यांचे नियोजन झाले पाहिजे. त्यात दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र कर्नाटकला किंवा कर्नाटक महाराष्ट्राला पाणी देतो, तसे योजनेच्या लाभक्षेत्रात भाग आहे का नाही, हे अधिकाऱ्यांनी पाहू नये, अशा सूचना कराव्यात. पक्षभेद न करता आम्ही पाणीपट्टीची वसुली करू, पण शेतकऱ्यांना टेंभू योजनेची ५ आवर्तने देण्याची व्यवस्था करावी. वर्षातून एकदा शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी घ्या.यावेळी रावसाहेब पाटील यांनी, कचरे वस्ती तलावातून पाणी सोडावे, अशी मागणी केली. बंडोपंत देशमुख, महिपती पवार, आटपाडीच्या सरपंच सौ. स्वाती सागर यांनी, टंचाई परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत मागण्या केल्या. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, सभापती सौ. सुमन देशमुख, उपसभापती भागवत माळी उपस्थित होते. (वार्ताहर)