कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रास पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सांगली येथे रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी सुरेखा जाधव, संजीव पाटील, आशा पाटील, एम. के. जाधव, नितीन चिवटे, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सांगली जिल्हा परिषदच्या वतीने सांगली येथे रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन चिवटे यांच्याकडे ती सुपुर्द करण्यात आली.
हे प्राथमिक आरोग्य केंद्र आशिया राष्ट्रीय महामार्गालगत असून, या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येडेनिपाणी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, वाघवाडी, तुजारपूर, लोणारवाडी, आदी गावांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रास असलेली पूर्वीची गाडी कालबाह्य झाली होती. त्यामुळे या केंद्रास रुग्णवाहिका मिळावी यासाठी सातत्याने मागणी होत होती. यासाठी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, पंचायत समिती सदस्या सविता पाटील व सरपंच स्वप्नाली जाधव यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मंगळवारी (दि. २३) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ही रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रदान करण्यात आली.
यावेळी कामेरी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, आरोग्य सभापती आशा पाटील, उद्योजक एम. के. जाधव, कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन चिवटे, आदी उपस्थित होते.