शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या विकासाचा हिशेब द्या

By admin | Updated: January 16, 2015 23:41 IST

विरोधकांना नामोहरम करू

अशोक पाटील -इस्लामपूर  शहरात कोट्यवधी रुपयांचा विकास झाला आहे. त्या झालेल्या विकासाचा अगोदर चुकता हिशेब द्या, नंतरच निकृष्ट दर्जाच्या विकास कामांचे उद्घाटन करा, असे आव्हान भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाटील व विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी सत्ताधाऱ्यांना ‘लोकमत’शी बोलताना दिला.पाटील व कुंभार म्हणाले, इस्लामपूर शहरात झालेल्या विकासाचा भकास झाला आहे. चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेला पोहण्याचा तलाव भुईसपाट झाला आहे. कोट तलावाचे काम बंद आहे. नवीन केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांवर १५ दिवसात खड्डे पडले आहेत. उद्घाटन होत असलेल्या व्यापारी संकुलनाचे चुकीच्या पध्दतीने टेंडर काढण्यात आले आहे. महादेवनगर येथील घरकुलांची अवस्था दयनीय झाली आहे. भुयारी गटार योजनेचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. २४ बाय ७ पाणी योजना अद्यापही अधांतरीच आहे.अत्याधुनिक सिग्नल, डिजिटल लायब्ररी, वायफाय योजनेच्या फक्त घोषणाच झाल्या आहेत. अन्यायकारक विकास आराखडा अद्यापही शासनदरबारी प्रलंबित आहे. सर्व्हेसाठी पालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली आहे. चौकांच्या सुशोभिकरणाचा पत्ता नाही. शहरातील वाहतूक कोंडी सर्वसामान्यांसाठी जीवघेणी बनली आहे. शतकोटी वृक्षारोपणाचे तीनतेरा वाजले आहेत, असाही आरोप कुंभार व पाटील यांनी केला.नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचा दर्जा तपासून पाहण्याची गरज आहे. त्याचा अगोदर त्यांनी हिशेब द्यावा. आता केंद्रात व राज्यात सत्ता आमची आहे. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या विकासकामांचे आम्ही बघून घेऊ. येणाऱ्या निवडणुकीत सत्ता आमचीच आहे. तेव्हा विकास कशाला म्हणतात, हे आम्ही सर्वांना दाखवून देऊ, असाही इशारा विरोधकांनी दिला आहे.विरोधकांना नामोहरम करूयाबाबत सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील म्हणाले की, या विरोधकांना हिशेब मागण्याचा अधिकार कोणी दिला?, त्यासाठी किती पगार दिला जातो? पाटलाच्या वाड्यावर जेवणाचं आवतन न देता पंगतीला बसणाऱ्या विरोधकांची काय ताकद आहे? आम्ही केलेल्या विकास कामांची मापे काढण्याचा तुमचा प्रांत नाही, त्यामुळे तो प्रयत्न करू नका, पालिकेच्या आगामी निवडणुकीत २८ पैकी २८ जागा जिंकून विरोधकांना नामोहरम करून त्यांची जागा दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.