शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

कोथळे खून खटला संशयितांनी वकील न दिल्याने लांबणीवर : उज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:39 IST

पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सातही संशयितांनी अजून वकील न दिल्याने हा खटला लांबणीवर पडला आहे, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी गुरुवारी दिली. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषारोपपत्राची सर्व माहिती घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोथळे खून खटला संशयितांनी वकील न दिल्याने लांबणीवर : उज्वल निकमसीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासाची घेतली माहिती

सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सातही संशयितांनी अजून वकील न दिल्याने हा खटला लांबणीवर पडला आहे, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी गुरुवारी दिली. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषारोपपत्राची सर्व माहिती घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.सांगलीतील अनिकेत कोथळे खून खटला व हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून खटल्यात निकम यांची नियुक्ती झाली आहे. या दोन्ही खटल्याच्या सुनावणीसाठी निकम गुरुवारी सांगलीत आले होते. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, कोथळे खून खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात संशयित आहेत. सध्या सर्वजण न्यायालयात कोठडीत आहेत. एकाही संशयिताने वकील न दिल्याने खटल्याची सुनावणी सुरु होऊ शकली नाही. सीआयडीचे पोलीस उपअपधीक्षक मुकूंद कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी केलेल्या तपासाची माहिती घेतली आहे.साक्षीदार किती आहेत? त्यांचे जबाब नोंदविले आहेत का? याचीही माहिती घेतली आहे. पोलीस कोठडीत संशयिताचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्याची ही पहिली घटना घडली.निकम म्हणाले, राज्यात न्यायाधिशांची संख्या कमी असल्याने प्रचंड खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायाधिशांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित खटल्याचा भविष्यकाळात निपटारा होईल. गुन्हेगारीत ज्या पद्धतीने वाढ होत आहे, त्यातुलनेत गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. न्ययदानावर लोकांचा अजूनही विश्वास आहे. हा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होणे गरजेचे आहे.कोथळे कुटूंबाने घेतली भेटसंपूर्ण राज्यभरात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात नियुक्ती झाल्यापासून उज्वल निकम पहिल्यांदाच सांगलीत आले होते. अनिकेतचा भाऊ आशीष व अमित कोथळे यांनी निकम यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. हे प्रकरण कसे घडले? याची त्यांच्याकडूनही माहिती घेतली. कोथळे बंंधूनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आम्ही लवकर न्याय द्यावा, अशी मागणी केली.खोटी गांधीगिरी करुन पाप धुतले जात नाहीमनुष्य एका पदावर गेल्यानंतर आपलं कोण काही करु शकणार नाही, असे त्याला वाटते. मग तो मनाला येईल, तसे वर्तण करतो. यातून त्यांचे वर्तण गुन्हेगारी स्वरुपाचे बनते. स्वत:ला संत समजणाऱ्यांनी गुन्हेगारी कृत्ये केली तर काय आदर्श राहणार? म्हणून आसारामबापूसारखच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा होते, ते योग्यच आहे. नेता असो अथवा अभिनेता, न्याय देवता पाहत नसते. संजय दत्तला शिक्षा झाली. आता सलमान खानलही शिक्षा झाली आहे. खोटी गांधीगिरी करुन पाप धुतले जात नाही.

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणUjjwal Nikamउज्ज्वल निकमSangliसांगली