शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३० बॅँकांकडून मागविला नोंदणी रद्दचा प्रस्ताव, सहकार विभागाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:16 IST

राज्यातील ३० पैकी काही बॅँकांनी अवसायनास मुदतवाढ मिळावी म्हणून यापूर्वीच सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत.

- अविनाश कोळीसांगली : अवसायनाची १० वर्षांची मुदत संपलेल्या वा संपण्याच्या मार्गावर असलेल्या सुमारे ३० सहकारी नागरी बॅँकांकडून नोंदणी रद्दबाबतचे प्रस्ताव सहकार विभागाने मागविले आहेत. दुसरीकडे महाराष्टÑ सहकारी संस्था कायद्यातील १0 वर्षांची अवसायन तरतूद १५ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या विचारासाठी पाठविला आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत यातील काही बॅँका सलाईनवर राहणार आहेत.

एका प्रकरणात उच्च न्यायालयाने सहकारी बॅँकांच्या अवसायन मुदतवाढीची प्रक्रिया चुकीची असल्याचे मत मांडून, यापुढे कोणत्याही संस्थांना कलम १५७ अंतर्गत मुदतवाढ देता येणार नाही, असे आदेश मे २०१९ मध्ये दिले होते. त्यामुळे आतापर्यंत ज्या सहकारी बॅँकांच्या अवसायन मुदत संपली आहे वा नजीकच्या काळात संपणार आहे, अशा सहकार विभागाने ३० सहकारी बॅँकांना पत्र पाठविले आहे. सहकार विभागाचे अप्पर आयुक्त व विशेष निबंधक डॉ. आनंद जोगदंड यांनी बॅँकांची नोंदणी रद्द करण्याबाबत प्रस्ताव देण्याची सूचना दिली आहे. काही बँकांना पत्रे मिळाली असून, सर्व संबंधित बॅँकांना नोंदणी रद्दचा प्रस्ताव पाठवावा लागेल.

राज्यातील ३० पैकी काही बॅँकांनी अवसायनास मुदतवाढ मिळावी म्हणून यापूर्वीच सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र ते न्यायालयीन आदेशानुसार फेटाळले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतानाच, सहकार विभागाने सहकारी संस्था कायद्यातील अवसायनाची १0 वर्षांची मुदत १५ वर्षे करावी, असे सुचविले आहे. मंत्रिमंडळाची संमती मिळाल्यास ३० बॅँकांच्या अवसायन मुदतवाढीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. मात्र तोपर्यंत या बॅँकांना सलाइनवर राहतील. बॅँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीचे अधिकार असले तरी, अवसायकांची भूमिका यात सर्वात महत्त्वाची असल्याने मुदतवाढीसाठी ठेवीदार संघटना आग्रही आहेत.

नोंदणी रद्द झाली, तर काय होणार?अवसायन मुदतवाढीस मज्जाव करताना वसुली, जप्ती व अन्य कामांचे अधिकार बॅँकेला राहतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे नोंदणी रद्द झाली तरीही वसुली व कारवाई थांबणार नाही. त्यामुळे ठेवीदारांना धोका नाही. तरीही ठेवीदार संघटना अवसायन मुदतवाढीसाठी आग्रही आहेत.

अशा आहेत तरतुदीसहकारी संस्था कायदा (१९६०) मधील कलम १०९ (१) नुसार अवसायन मुदत संपल्यानंतर संस्थांची नोंदणी आपोआप रद्द होते, तर कलम १५७ अंतर्गत अवसायन मुदतवाढीस मंजुरी देता येते. अवसायनातील ३० बँकांकडून नोंदणी रद्दचे प्रस्ताव मागविले आहेत. न्यायालयाचे १0 वर्षांनंतर अवसायन मुदतवाढ न देण्याचे आदेश आहेत. आम्ही अवसायन मुदत १५ वर्षे करावी म्हणून दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास दिला आहे.- आनंद कटके, उपनिबंधक, सहकारी संस्था (अर्बन बँक) , सहकार आयुक्त कार्यालय, पुणेअवसायन मुदत संपलेल्या बँकापीपल्स बँक (कोल्हापूर), लॉर्ड बालाजी (सांगली), जिव्हेश्वर (कोल्हापूर), रवी (कोल्हापूर), मिरज अर्बन (सांगली), एस. के. पाटील (कोल्हापूर), साधना (कोल्हापूर), वसंतदादा शेतकरी(सांगली),यशवंत सहकारी, मिरज (सांगली), कुपवाड बँक (सांगली)(याशिवाय नजीकच्या काळात अवसायनाची मुदत संपुष्टात येणाºया बँकांची संख्या २० च्या घरात आहे )वसंतदादा बॅँकेचा समावेशएकेकाळी नावलौकिक व राज्यभर विस्तार असलेली वसंतदादा शेतकरी बॅँकही या यादीत आहे. या बॅँकेची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्तावही सहकार विभागाने मागविला आहे. या बॅँकेची अवसायन मुदतवाढ फेब्रुवारी २०२० मध्ये संपणार आहे. सध्या बॅँकेच्या इमारतींचा लिलाव व सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टखाली थकबाकीदारांच्या वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :bankबँक