शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग सभापती निवडी लांबणीवर

By admin | Updated: March 22, 2016 23:24 IST

रचनेत बदलासाठी गोपनीय बैठक : महासभेत ठरावाच्या हालचाली

सांगली : महापालिकेच्या चारपैकी दोन प्रभाग समितीत सत्ताधारी काँग्रेसचे वर्चस्व कायम रहावे, यासाठी रचनेतच फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मंगळवारी महापौर हारूण शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनी रात्री उशिरापर्यंत रचनेबाबत खलबते केली. येत्या महासभेत नवीन प्रभाग रचना अस्तित्वात आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रभाग सभापतीच्या निवडी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. पण चारही प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक निवडीवेळी कसरत करावी लागते. प्रभाग समिती एक व चारमध्ये काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. प्रभाग दोन व तीनमध्ये सत्ताधारीपेक्षा विरोधकांचे संख्याबळ अधिक असल्याने या दोन समितीत काँग्रेसला तडजोडीचे राजकारण करावे लागते. प्रत्येक सभापती निवडीत दोन समित्यांमध्ये काँग्रेसची अवस्था बिकट होते. त्यावर उपाय म्हणून आता प्रभाग समितीच्या रचनेतच बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसा ठरावही सत्ताधाऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या महासभेत करून घेतला होता. विद्यमान चारही सभापतींची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, नगरसेवक राजेश नाईक यांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. येत्या महासभेत नवीन प्रभाग रचनेचा ठराव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)दोन व तीन प्रभागात बदलप्रभाग समिती दोन व तीनमधील सदस्य संख्येत बदल करण्यात येणार आहे. या दोन्ही समित्यांवर विरोधकांचे वर्चस्व आहे. यापैकी सांगलीतील प्रभाग समिती दोन सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात राहील, अशी व्यूहरचना आखली जात आहे. त्यासाठी प्रभाग तीनमधील दोन सदस्यांना प्रभाग दोनमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. त्यातून प्रभाग तीनमध्ये काँग्रेसचे संख्याबळ कमी होईल. मिरजेतून काही सदस्यांना प्रभाग तीनमध्ये समाविष्ट करता येते का? याची चाचपणी सुरू आहे. तसे न झाल्यास प्रभाग तीन सोडून इतर तीन समित्या तरी आपल्या ताब्यात राहतील, अशी रचना होणार आहे.