कासेगाव : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पादनवाढीचे लक्ष्य गाठू शकतो. मात्र त्यावेळी आपणास मागच्या पिढीने दिलेली शेतजमीन क्षारपड होणार नाही, याकडेही लक्ष देवूया, असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.
कासेगाव येथे राजारामबापू कारखान्याच्या राजारामबापू उच्च तंत्रज्ञान गट शेती व ठिबक सिंचन योजनेंतर्गत आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील, संचालक आनंदराव पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, सुभाषराव जमदाडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सुजय पाटील उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, मी येत्या काही वर्षात तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा, उत्पादनवाढ तसेच पाणीपुरवठा संस्थांवर गट शेती करण्यासाठी काम करणार आहे.
सुभाषराव जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी ठिबक सिंचन योजनेबद्दल तर अतुल पाटील यांनी ड्रोनबद्दल माहिती दिली.
देवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी रोहित साळुंखे यांनी आभार मानले. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी श्यामराव पाटील, नेताजीराव पाटील, रामभाऊ माळी, पोपटराव जगताप, प्रशांत बर्डे, उदय पाटील, सरपंच किरण पाटील, उपसभापती सुरेश गावडे, शंकरराव भोसले, उपसरपंच दाजी गावडे, प्रा. कृष्णा मंडले, नंदा पाटील, सुनंदा देशमुख व शेतकरी उपस्थित होते.
फोटो- ०३०२२०२१-आयएसएलएम- कासेगाव न्यूज
कासेगाव येथील परिसंवादात प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जनार्दनकाका पाटील, आनंदराव पाटील, देवराज पाटील, सुभाषराव जमदाडे, प्रशांत पाटील उपस्थित होते.