शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक : ईद-ए-मिलाद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:20 IST

सांगली/मिरज : महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सांगली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. माजी मंत्री पतंगराव कदम काहीवेळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.बदाम चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्टेशन चौक, आझाद चौक, काँग्रेस भवन, राम मंदिर कॉर्नर, राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक, हरभट रस्ता, महापालिका, मुख्य बसस्थानक, सिव्हिल चौक, फौजदार गल्ली आदी ...

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांचे आयोजन, विशेष प्रार्थनाबाराईमाम दर्ग्यापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत पारंपरिक अरबी पध्दतीच्या वेशभूषेत घोड्यावर बसलेली लहान बालके,

सांगली/मिरज : महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सांगली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. माजी मंत्री पतंगराव कदम काहीवेळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.बदाम चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्टेशन चौक, आझाद चौक, काँग्रेस भवन, राम मंदिर कॉर्नर, राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक, हरभट रस्ता, महापालिका, मुख्य बसस्थानक, सिव्हिल चौक, फौजदार गल्ली आदी मार्गावरुन फिरुन बदाम चौकात मिरवणुकीची सांगता झाली. लहान मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

मदिनाची प्रतिकृती व अग्रभागी घोडे मिरवणुकीत होते. हिंदू मित्र मंडळ, एकता रिक्षा मंडळ, दलित संघटना तसेच शीख समाजातील पदाधिकारीही सहभागी झाले होते. माजी मंत्री पतंगराव कदमही मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी शहर पोलिस ठाण्याजवळ मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी आसिफ बावा, उमर गवंडी, इकबाल जमादार, शहानवाज फकीर, युसूफ मेस्त्री, जावेद पठाण, साहील खाटीक आदी उपस्थित होते.

मिरज : मिरज शहर परिसरात पैगंबर जयंती व ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. बाराईमाम दर्ग्यापासून शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी होते. मीरासाहेब दर्गा आवारात मिरवणुकीचा समारोप झाला. बाराईमाम दर्ग्यापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत पारंपरिक अरबी पध्दतीच्या वेशभूषेत घोड्यावर बसलेली लहान बालके, रिक्षा, बैलगाड्या व डफवादक फकीर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. लक्ष्मी मार्केट, शास्त्री चौक, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, भंडारी बाबा दर्गामार्गे मिरवणुकीचा मीरासाहेब दर्ग्याच्या आवारात समारोप झाला. समारोपप्रसंगी विशेष प्रार्थना झाली. मिरवणुकीत विविध संघटनांतर्फे सहभागी झालेल्यांना सरबत वाटप करण्यात आले. दर्गा सरपंच अजिज मुतवल्ली, मौलाना अन्वर, मौलाना नुरी, ए. जी. नदाफ, असगर शरीकमसलत, जैलाब शेख, जानीब मुश्रीफ, मुस्लीम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी, इद्रिस नायकवडी, उद्योजक नूर मोहम्मद यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

दर्गा आवारात मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी नात शरीफ सलाम व प्रार्थना झाली. मौलाना नुरी यांनी जगात शांततेसाठी प्रेषित पैगंबरांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. कवी नौशाद यांनीही शायरीच्या माध्यमातून प्रबोधन केले. ईद-ए-मिलादनिमित्त मीरासाहेब दर्गा व मिरज शहरात विविध ठिकाणी अन्नदान करण्यात आले. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षक धीरज पाटील यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित होता.मिरजेत भाजप, शिवसेनेतर्फे स्वागतखा. संजय पाटील, भाजप नेते दीपक शिंदे, गजेंद्र कुळ्ळोळी यांनी मिरजेतील किसान चौकात मिरवणुकीचे स्वागत केले. शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, मलगोंड पाटील, दाऊद काजी मिरवणुकीत सहभागी होते. मिरवणूक मार्गावर एमआयएम, बसपा, सौदागर गल्ली फ्रेड सर्कल, रजा अ‍ॅकॅडमीतर्फे स्वागत करण्यात आले. भीम आर्मीतर्फे सरबत वाटप झाले.