शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका उत्साहात सांगलीत पोलिस बंदोबस्तात प्रक्रिया : कुठेही अनुचित प्रकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:13 IST

सांगली : गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सांगलीच्या विविध महाविद्यालयांमध्ये झालेल्या विद्यार्थी मंडळाच्या

सांगली : गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सांगलीच्या विविध महाविद्यालयांमध्ये झालेल्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला नाही. अपवाद वगळता कुठेही मोठा जल्लोष दिसून आला नाही.शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. काही महाविद्यालयात निवडणुका झाल्या, तर काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या.

२०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे यावर्षी उशिरा होत असलेल्या या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह अथवा जल्लोष दिसून आला नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी पोलिसांना पाचारण केले होते. महाविद्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

बुधवारी सकाळी निवडप्रक्रिया पूर्ण झाली. सव्वाअकरा ते सव्वाबारा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. छाननी प्रक्रिया सव्वाबारा वाजता पूर्ण झाली. एक वाजून पंधरा मिनिटांनी अर्ज माघारी घेण्यात आले. पात्र उमेदवारांसाठी अंतिम यादीनुसार दीड ते दोन या वेळेत मतदान पार पडले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. महाविद्यालयात जेथून आत प्रवेश करता येणे शक्य आहे, त्या ठिकाणी प्राध्यापक व पोलिस तैनात करण्यात आले होते.

श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये तेजस जाधव आणि अमरजा जोशी यांच्यात लढत झाली. यात जाधव यास ११, तर जोशी हिला ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. मिलिंद वडमारे यांनी जाधव यास विजयी घोषित केले. महाविद्यालयाच्यावतीने तेजस जाधव याचा सत्कार करण्यात आला.जी. ए. कॉलेजमध्येही निवडणूक बिनविरोध झाली. तेथे प्रतीक अजितकुमार पाटील निवडून आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. बी. बी. गुंडेवाडी यांनी काम पहिले.

एन. एस. लॉ कॉलेजमध्ये मयूर लोंढे आणि नताशा मार्टिन या दोघांत निवडणूक झाली. यामध्ये मयूरला ७, तर नताशाला ५ मते मिळाली. मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात पौर्णिमा भास्कर उपळावीकर ही एम.कॉम.- भाग १ ची विद्यार्थिनी बिनविरोध निवडून आली. विलिंग्डन महाविद्यालयात ऋषिकेश संतोष कदम आणि अनिकेत भंडारे यांच्यात लढत झाली. यात कदम यास १०, तर भंडारे यास ७ मते मिळाली. चिंतामण कॉलेजमध्येही निवडणूक झाली. यात नीलेश कुलकर्णी याने जाधव याच्यावर ८-५ असा विजय मिळवला. तासगाव येथील ए. सी. एस. महिला महाविद्यालयात धनश्री जाधव ही बिनविरोध निवडून आली.

विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम करण्यास अवघा एक ते दीड महिन्याचाच कालावधी मिळणार आहे. एक-दोन महाविद्यालयांच्या बाहेरील जल्लोष वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अथवा इतरत्र जल्लोष दिसून आला नाही.प्राचार्यांतर्फे सत्कारडॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात निवडणूक बिनविरोध झाली. मोरेश्वर राजेंद्र पाटील याची बिनविरोध निवड झाली. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी प्रा. एम. एच. पाटील, प्रा. रुपाली कांबळे आदी उपस्थित होते.