शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 17, 2014 23:40 IST

खरीप हंगाम वाया : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

दरीबडची : जूनच्या अखेरीसह मान्सून पावसाने दिलेली हुलकावणी, पाणी पातळीत झालेली घट, कोरडे पडलेले तलाव यामुळे जत तालुक्यातील दुष्काळाची भीषणता अधिक गडद झाली आहे. तालुक्यात आजअखेर केवळ २३ टक्केच खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, पावसाअभावी पेरण्या लांबल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे स्पष्ट होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.सांगली जिल्ह्याच्या इतर भागात मान्सून पाऊस सुरु आहे. परंतु, जत तालुक्याकडे सध्याही मान्सून पावसाने पाट फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तालुक्यातील २६ तलावांपैकी १८ तलाव कोरडे पडले आहेत. ८ तलावांमध्ये १७.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने १५ दिवसांत लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिथं पाणी आहे त्या तलावातील पाणीही लवकरच संपण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आली आहे. तालुक्यातील पाणी टंचाई ही सर्वात गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्याने प्रशासनही हादरले आहे. पाणी व चारा टंचाईने तालुक्यातील जनता मेटाकुटीला आली आहे.जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या अवकृपेने १८७२ पासून कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कुंभारी परिसरातील गावांमध्ये पाण्याची सुकाळ परिस्थिती आहे. त्या परिसरातील तलावांना थोड्या प्रमाणात पाणीसाठा आहे.मान्सून पाऊस येण्याच्या कालावधितच एप्रिल-मे हिटप्रमाणे ऊन पडल्यामुळे कोवळी पिके वाळून गेली आहेत. पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेतकरी मोठ्याप्रमाणात विहिरी व कूपनलिका खोदू लागला आहे. पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने डाळिंबाच्या बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी कमी पडले, तर चांगल्या प्रतीच्या काड्या तयार होणार नाहीत.तलावात पाणीसाठा नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी उपशाला बंदी घालण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पुन्हा घामाच्या धारा वहात आहेत. तालुक्यातील सोरडी, सनमडी, येळवी, रेवनाळ, मिरवाड, अंकलगी हे तलाव आणि संख मध्यम प्रकल्प, दोड्डनाला मध्यम प्रकल्पही कोरडे पडले आहेत. (वार्ताहर)