शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कॉफी हाऊसवर छापा - अश्लील चाळे करणाऱ्या दहा प्रेमीयुगुलांना ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:39 IST

विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळील एम. एस. कॉफी हाऊस अ‍ॅण्ड फास्ट फूडमधील दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांचा सुरु असलेला अड्डा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकून उद्ध्वस्त केला

ठळक मुद्देअश्लील चाळे करण्यास बसण्यासाठी जागा-ताशी शंभर रुपये शुल्क घेतले जात होते

सांगली : विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळील एम. एस. कॉफी हाऊस अ‍ॅण्ड फास्ट फूडमधील दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करणाºया प्रेमीयुगुलांचा सुरु असलेला अड्डा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात अश्लील चाळे करणाऱ्या दहा प्रेमीयुगुलांना ताब्यात घेण्यात आले. कॉफी हाऊसचा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉफी हाऊसच्या नावाखाली अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने गेल्या दोन दिवसांपासून या कॉफी हाऊसवर वॉच ठेवला होता. तेथे बोगस ग्राहक पाठविले असता, हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करण्यास बसण्यासाठी जागा दिली होती. यासाठी ताशी शंभर रुपये शुल्क घेतले जात होते. पथकाने गुरुवारी येथे छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच अश्लील चाळे करीत बसलेल्या प्रेमीयुगुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडले. दहा प्रेमीयुगुले सापडली. ती सर्व शहर परिसरातील आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, शकुंतला वागलगावे, सहायक फौजदार भगवान नाडगे, हवालदार विकास पाटणकर, महेशकुमार जिनगर, मनीषा कोरे, संदीप तेली, अभिजित गायकवाड, सीमा पाटील, शरद कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.पालकांसमोर समुपदेशनकॉफी हाऊसमध्ये सापडलेल्या प्रेमीयुगुलांच्या पालकांशी पथकाने संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. पोलीस समुपदेशन समितीमधील सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी त्यांचे समुपदेशन केले. असे प्रकार करताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

टॅग्स :Sangliसांगलीsexual harassmentलैंगिक छळ