शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान म्हणाले, कसे आहात तुम्ही?

By admin | Updated: July 13, 2014 01:08 IST

‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ने दिली संधी : मोदींच्या भेटीने भारावला नेर्ले येथील प्रणव

इस्लामपूर : मुंबई ते दिल्ली असा विमान प्रवास वयाच्या अकराव्या वर्षी करेन, असा विचार स्वप्नातही आला नाही. देशाच्या पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट होईल, त्यांच्याशी बोलता येईल, ही तर अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र ‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे या स्वप्नवत घटना प्रत्यक्षात उतरल्या, याचा अभिमान आणि आनंद आहे. या विमान प्रवासासाठी सांगली जिल्ह्यातून माझी एकट्याची निवड झाली, तेव्हापासून विमानात बसण्याच्या विचाराने मनात रुंजी घातली होती. दिल्लीतील संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासमोर होते आणि मराठी भाषेत त्यांनी आमच्याशी संवाद साधताना ‘कसे आहात तुम्ही?’ ‘कुठून आला’, अशी विचारपूस केली. हा क्षण तर अंगावर रोमांच उभा करणारा होता... अशा शब्दात नेर्ले (ता. वाळवा) येथील प्रणव जाखले याने ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या.‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या गतवर्षीच्या स्पर्धेत राज्यभरातून जिंकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सांगली जिल्ह्यामधील नेर्ले येथील प्रणव बाळासाहेब जाखले याचा समावेश होता. तो राजारामनगर (साखराळे) येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सहावीत आहे. राज्यभरातील या विजेत्या मुलांना दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घालून देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. मोदींच्या भेटीने व संवादाने भारावलेल्या या मुलांना हवाई सफरीसह राजधानी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन, राजघाट, इंडिया गेट, संसद भवन, सायन्स म्युझियम अशी विविध ठिकाणेही पहायला मिळाली. ‘लोकमत’शी बोलताना प्रणव म्हणाला की, सकाळी सात वाजता मुंबईतून विमानाने उड्डाण केले. दोन तासांच्या प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर उतरलो. आयुष्यातील या पहिल्या विमान प्रवासाचा आनंद घेतानाच पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची आतुरता व हुरहूर लागली होती. त्यांच्याशी इंग्रजीमधून संभाषण करण्याची तयारी केली होती. विमानतळावरून राज्यातील आम्ही सर्व विद्यार्थी बसने निघालो. ‘लोकमत’ परिवारातील अधिकाऱ्यांनी आम्हाला दिल्लीतील विविध ठिकाणे दाखवून संसद भवन परिसरात आणले.संसद परिसरात आल्यावर प्रत्यक्ष पंतप्रधानांची भेट होईपर्यंत सात ते आठ ठिकाणी आमची सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. पेन, कॅमेरा, मोबाईल, सुटे पैसेसुद्धा बरोबर ठेवण्यास त्या परिसरात प्रतिबंध असतो. येथील सुरक्षा यंत्रणा, नागरिकांची मोठी गर्दी, बाजूला विविध वाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स, माईक, कॅमेरे लागलेले होते. समोर संसदेची भव्य वास्तू अशा वातावरणात एका दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासमोर आले. त्यांनी थेट मराठीत बोलत माझ्याशी हस्तांदोलन करत नाव, गाव, जिल्हा अशी माहिती घेत खूप शिका, मोठे अधिकारी बना व आपले जीवन देश कार्यासाठी अर्पण करा, अशा शुभेच्छा दिल्या.अशक्य ते शक्य... फक्त ‘लोकमत’मुळेच!प्रणवचे वडील बाळासाहेब ऊर्फ वैभव जाखले म्हणाले की, सांगली जिल्ह्यात ‘लोकमत’ आल्यापासून आम्ही नियमित वाचक आहोत. काही वर्षे वितरणाचे कामही केले आहे. शेतकऱ्याच्या घरातील मुलाला विमान प्रवासाची संधी मिळाली, याचा आनंद आहे. आम्ही फक्त स्वप्नातच विमान प्रवास रंगवला, मुलाने हे स्वप्न पूर्ण केले. अशक्य ते शक्य हे केवळ ‘लोकमत’मुळेच झाले. ‘लोकमत’ परिवाराप्रती कृतज्ञ आहोत. (वार्ताहर)