शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बैलांच्या किमती ट्रॅक्टरलाही सारताहेेत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

सांगली : यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या मशागत कामात बैलांची संख्या घटली, तरीही त्यांच्या किमती सोन्याशी स्पर्धा करत आहेत. मिरजेच्या जनावर बाजारात ...

सांगली : यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या मशागत कामात बैलांची संख्या घटली, तरीही त्यांच्या किमती सोन्याशी स्पर्धा करत आहेत. मिरजेच्या जनावर बाजारात मशागतीच्या बैलाची किंमत सरासरी साठ हजारांच्या पुढे गेली आहे. गावस्तरावरील उलाढालीत त्यांना लाखोंचा भाव मिळत आहे.

मशागतीसाठी ट्रॅक्टर वाढले, तरी बैल अजूनही भाव खाताहेत. विशेषत: मशागत व शर्यत अशा दोन्ही कामांची सवय असलेल्या बैलांसाठी अक्षरश: लिलाव लागत असल्याची स्थिती आहे. बेडग (ता. मिरज) येथील नारायण पाटील यांची गज्या व वश्याची जोडी अशीच. कमी वयातच त्यांना शर्यतीबरोबर मशागतीचीही सवय त्यांनी लावली होती. गज्या साडेतीन, तर वश्या चार वर्षांचा. जोडीची किंमत तेरा लाख रुपये सांगितली होती, कारंदवाडी (ता. वाळवा ) येथील प्रवीण पाटील व बटू पाटील या शेतकऱ्यांनी ती साडेदहा लाखांना घेतली. टोकदार शिंगे, पांढरीशुभ्र त्वचा आणि हृद्याचा वेध घेणारे काळेभोर डोळे अशी देखणी, धिप्पाड जोडी त्यांच्या दावणीची शोभा वाढवताहेत.

चौकट

मिरजेचा बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध

मिरजेचा जनावर बाजार सध्या लम्पी आजारामुळे बंद आहे. पुढील सूचनेपर्यंत तो भरवू नये, असे आदेश निबंधकांनी काढले आहेत. तत्पूर्वीपर्यंत बाजार मोठ्या प्रमाणात भरत होता. बुधवारची एका दिवसाची उलाढाल एक ते सव्वा कोटीवर जायची. सांगली, कऱ्हाड, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव आदी जिल्ह्यांतून खरेदी व विक्री करणारे व्यापारासाठी येतात. बैलांना सांभाळणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे आणि खर्चिक होत असले, तरीही बैल बाजार फार्मात असतो. बैल, म्हैस, संकरित गायी तसेच लहान जनावरे मिळून या बाजारात कोट्यवधींची उलाढाल हमखास होते.

चौकट

- दुधाळ जनावरांची मागणी मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. चारापाणी व अैाषधांचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या दावणी रिकाम्या पडू लागल्या आहेत.

- एका म्हैशीचा दररोजचा किमान खर्च दीड-दोनशे रुपये होतो. त्यामुळे शेतकरी संकरित गायीकडे वळले आहेत.

- मिरजेच्या बाजारात म्हैशींची सरासरी आवक ३०० ते ५०० इतकी होते, त्याचवेळी संकरित गाई मात्र ५०० हून अधिक असतात.

- दुधाचे उत्पादन वाढते, तेव्हा दूध संघांकडून संकरित गाईंचे दूध नाकारण्याचे प्रकार वारंवार घडतात, त्यामुळेही शेतकरी त्याकडे पाठ फिरवू लागले आहेत.

चौकट

एका बैलजोडीचा दररोजचा खर्च हजारावर

जातिवंत बैलांची एक खिलार जोडी दावणीला सांभाळायची, तर दररोजचा खर्च हजार रुपयांच्या घरात जातो. आठ किलो भरडा, चार लिटर दूध, सहा ते आठ किलो हरभरा, मटकी, काट्याळ, सुकी व ओली वैरण यांची बेगमी करायची, तर शेतकऱ्याला मोठी तोशीस सोसावी लागते. पण बैलाशिवाय दावणीला शोभा नाही, असे मानणारा जातिवंत शेतकरी पोराबाळांना कमी करून बैलजोडीचे पोट भरतो.

कोट

बैलांची जोडी हिमतीने सांभाळली. खर्चही केला, पण त्यांना किंमतही चांगली मिळाली. खिल्लार जोडी सांभाळणे दिवसेंदिवस सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहे.

- नारायण पाटील, बेडग

कोट

अनेक वर्षांपासून बैलांची हौस आहे. जातिवंत बैलांपुढे पैशांची फिकीर करून चालत नाही. गज्या-वश्याने आमच्या दावणीची शोभा वाढविली आहे.

- प्रवीण पाटील, कारंदवाडी

कोट

बैलांची जोडी सांभाळणे म्हणजे खायचे काम नाही. प्रसंगी स्वत:चा खर्च कमी करून खोंडांसाठी जीव ओतावा लागतो. पशुखाद्याच्या किमती दिवसेंदिवस आवाक्याबाहेर चालल्याने बैलांचा खर्चही वाढला आहे, पण खानदानी शेतकरी मागे हटणारा नाही.

बटू पाटील, कारंदवाडी