शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार कारखान्यांचा परवाना रोखणार

By admin | Updated: September 4, 2014 00:03 IST

साखर आयुक्तांचा निर्णय : वसंतदादा, तासगाव साखर कारखान्यांचा प्रश्न गंभीर

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २०१३-१४ च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व थकित बिले देण्याची कारखाना प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांची कारखान्याकडे थकबाकी असेल, तर त्या साखर कारखान्यास २०१४-१५ च्या हंगामासाठी गाळप परवाना देण्यात येणार नाही, असा इशारा साखर आयुक्तांनी लेखी आदेशाद्वारे दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सर्व कारखान्यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वसंतदादा आणि तासगाव साखर कारखान्यांना गळीत हंगामाचा परवाना मिळण्याची शक्यता धूसर आहे.वसंतदादा साखर कारखान्याने २०१३-१४ गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची ४५ कोटींची देणी अद्यापही दिलेली नाहीत. उसाची बिले भागविण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरज तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीसही बजाविली आहे. त्यातच साखर गोदामालाही सील ठोकले आहे. शेतकऱ्यांच्या देणीसोबतच जिल्हा बँकेचेही ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अद्याप त्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या वर्षीचा गळीत हंगाम घेण्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत प्रस्ताव पाठवायचे आहेत. गाळप परवाना मागताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र त्याला जोडायचे आहे. वसंतदादा कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या उसाची ४५ कोटींची देणी दिली नाहीत. ही थकबाकी दिल्याशिवाय त्यांना गाळप परवाना देणार नसल्याचे आयुक्त कार्यालयाने सांगितले आहे. तासगाव कारखाना सुरू करण्यास राज्य बँकेचाच खोडा असल्यामुळे तो सुरू होणार नाही. शिवाय, शेतकरी आणि कामगारांच्या थकित पगाराचा मुद्दाही गाळप परवान्यावेळी उपस्थित होणार आहेत. या सर्व कारणांमुळे जिल्ह्यातील वसंतदादा आणि तासगाव कारखान्यांना प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडून गाळप परवाना मिळणेच कठीण आहे. (प्रतिनिधी)