इस्लामपूर : येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अंनिस लोकरंगमंचच्या ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगण नाट्याचा चाळीसावा प्रयोग बेळगाव येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात शनिवारी झाला. या नाटकास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या नाटकाचे लेखन प्रख्यात लेखक राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. एकनाथ पाटील, संजय बनसोडे यांनी केले आहे. प्रा. विजय पोवार, प्रा. योगेश कुदळे यांनी दिग्दर्शन केले. विजय व जगन्नाथ नांगरे यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. प्रायोगिक दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात रिंगणनाट्याचे १६ गट कार्यरत आहेत. या सर्व गटांचे दोनशेवर प्रयोग झाले आहेत.इस्लामपूरच्या या रिंगणनाट्याचे सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, बीड, इस्लामपूर परिसरात प्रयोग झालेले आहेत. अंनिसचे संस्थापक -कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे खुनी अद्याप सापडलेले नाहीत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व विवेकी विचारांचा प्रसार करण्यासाठी ही नाटके मोफत केली जातात.या रिंगणनाट्यात संजय बनसोडे, योगेश कुदळे, अवधूत कांबळे, विजय नांगरे, जगन्नाथ नांगरे, अजय भालकर, अजय काळे, सागर सूर्यवंशी, सुयश तोष्णीवाल, विजय कांबळे, अरुण भोसले आदी कलाकारांचा समावेश आहे. (वार्ताहर)प्रत्ययकारी सादरीकरण सॉक्रेटीसपासून ते दाभोलकरांपर्यंत तुकारामांच्या मार्गे जाणारी धर्मचिकित्सेची विज्ञानवादी परंपरा व त्यावर धर्मांधांनी केलेले हल्ले याचे प्रत्ययकारी सादरीकरण या रिंगणनाट्याद्वारे आपणास पहावयास मिळते.
‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’चे सादरीकरण
By admin | Updated: February 9, 2015 23:55 IST