सांगली : सांगली शहर व परिसरात गुरुवारी दुपारी भर उन्हात पावसाने हजेरी लावली. तासभर पाऊस झाला.
उन्हातील पावसाच्या हजेरीमुळे सांगलीतील आकाशात इंद्रधनुष्य साकारले गेले. सकाळपासून शहरात अंशत: ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजता पावसास सुरुवात झाली. तासाभरानंतर पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळनंतर ढगाळ वातावरण कायम होते. गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिली असली, तरी ढगाळ वातावरण कायम आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी आठवडाभर ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. या काळात पावसाच्या तुरळक सरींची हजेरी लागण्याची शक्यता आहे. २९ व ३० ऑगस्टला मोठ्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३३, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात कमाल व किमान तापमान घट होण्याची शक्यता आहे.