शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी निश्चितीपूर्वी भाजपची रणनीती तयार-मुंबईत बैठक : स्थानिक पातळीवरही स्वतंत्र जाहीरनामा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:57 IST

तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारी निश्चिती झाली नसली तरी, गेले दोन दिवस मुंबईत झालेल्या बैठकीत रणनीती निश्चित करण्यात आली आहे. केेंद्रीय पातळीवरील

सांगली : तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारी निश्चिती झाली नसली तरी, गेले दोन दिवस मुंबईत झालेल्या बैठकीत रणनीती निश्चित करण्यात आली आहे. केेंद्रीय पातळीवरील जाहीरनाम्याबरोबरच स्थानिक पातळीवरही स्वतंत्र जाहीरनामा तयार करून त्यापद्धतीने प्रचार करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. राज्यातील सर्वच मतदारसंघांबाबत याठिकाणी चर्चा करण्यात आली. बुथ समित्यांपासून निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्या नियुक्त करून काटेकोर नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. येत्या २४ मार्च रोजी युतीच्या महाराष्टÑातील प्रचाराचा नारळ कोल्हापूर येथे फुटणार असल्याने, त्यासाठीही सांगलीतील पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिसºया टप्प्यात असल्यामुळे उमेदवारीचा निर्णय नंतर घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उमेदवारी निश्चित होण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा पदाधिकाºयांनी स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू करावी. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करून तातडीने कामास सुरुवात करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभा मतदारसंघात कशापद्धतीने नियोजन करायचे आहे, याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. पक्षाच्या आमदारांवरही विविध जबाबदारी सोपविण्यात आली आहे.स्थानिक प्रश्नांना प्राधान्यकेंद्रीय कार्यकारिणीच्या जाहीरनाम्याबरोबर स्थानिक पातळीवरही स्वतंत्र जाहीरनामा तयार केला जाणार आहे. स्थानिक कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश त्यामध्ये करावयाचा आहे, याबाबतची बैठक जिल्हास्तरावर घेतली जाणार आहे. महत्त्वाचे पदाधिकारी चर्चा करून याविषयीचा निर्णय घेणार आहेत.सभांच्या नियोजनाबद्दल दहा दिवसांत बैठकसांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन येत्या दहा दिवसात निश्चित होणार आहे. मिरज-सांगली रस्त्यावरील अंबाबाई तालीम संस्थेजवळील जागेत पुन्हा सभा होण्याची शक्यता आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी कोणत्या ठिकाणी सभा झाल्या होत्या, त्यांची यादी सादर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण