शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली मस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात श्रवणबेळगोळला सोहळा : राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण; ८० लाखाहून अधिक भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:38 IST

सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी भेट घेऊन त्यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.

सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक सोहळा समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वतिश्री जगद्गुरू चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होत आहे. त्यासाठी देश-विदेशातून ८० लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी पर्वतावरील महामस्तकाभिषेकासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून चार मजली पहाड उभारण्यात आला आहे. पर्वतावर ये-जा करण्यासाठी दोन लिफ्ट व अभिषेक सामग्रीसाठी स्वतंत्र लिफ्टची सोय केली आाहे. दररोज आठ हजार लोक पहाडावर जाऊ शकतात. बाहुबलींच्या मूर्तीवर काहीही परिणाम होऊ नये, यासाठी पुरातन विभागाने विशेष रसायनाचा लेप दिला आहे.

आवास व्यवस्थेसाठी ११ नगरांची रचना केली आहे. त्यात ३० हजार लोक राहू शकतील. पाच हजारहून अधिक कॉटेज उभारले आहेत. दररोज तीन लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात ३० आचार्य व चारश्ेवर मुनी व हजारो त्यागीगण सहभागी होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र त्यागीनगरची उभारणी करण्यात आली आहे. चंद्रगिरी पर्वतावरून मस्तकाभिषेक पाहता यावा, यासाठी एक लाख लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.या सोहळ्याचे उद््घाटन ७ फेब्रुवारीरोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते केले जाणार आहे. सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी भेट घेऊन त्यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. कर्नाटक सरकारने या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.रुग्णालय, प्राकृत विद्यापीठ स्थापणारमहामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर श्रवणबेळगोळ येथे ५० कोटी रुपये खर्चाचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. २० एकर जागेत सर्वसोयीनींयुक्त २०० खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. याठिकाणी प्राकृत विश्वविद्यापीठही स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारने २० कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेकाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.