शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे प्रमोद चौगुले राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम; अपेक्षित पदासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न

By अविनाश कोळी | Updated: February 28, 2023 23:09 IST

प्रमोद चौगुले हे सध्या नाशिक येथे उपसंचालक (उद्योग) या पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षीही ते राज्यात पहिले आले होते. अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती.

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या २०२१ च्या राज्यसेवा परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सांगलीतील प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम आले आहेत. प्रमोद चौगुले हे सध्या नाशिक येथे उपसंचालक (उद्योग) या पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षीही ते राज्यात पहिले आले होते. अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती. त्यातही त्यांना यश मिळाले.

प्रमोद चौगुले यांचे प्राथमिक शिक्षण सोनी (ता. मिरज) येथे झाले होते. सोनी हे त्यांचे मूळ गाव. सध्या ते सांगलीत स्थायिक झाले आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस (जि. सांगली) येथील नवोदय विद्यालय येथे झाले होते. वालचंदमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. उच्चशिक्षित प्रमोद चौगुले यांची भारत पेट्रोलियममध्ये निवड झाली होती. चौगुले यांनी जामनगर येथे सेवा बजावली आहे. 

भारत पेट्रोलियममध्ये काम करत असताना अधिकाऱ्यांच्या संपर्कातून त्यांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली. त्यांनी यूपीएससीची तयारी केली. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेत त्यांनी केवळ दुसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. पहिल्या प्रयत्नात त्यांची एका गुणाने संधी हुकली होती. त्याची कसर भरून काढत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात २०२० च्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. पोलिस उपअधीक्षक हे पद त्यांना हवे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. या दुसऱ्या प्रयत्नातही ते राज्यात प्रथम आले.

गरिबीतून शिक्षण घेत यशचौगुले यांच्या आई-वडिलांनी सुरुवातीच्या काळात खूप कष्ट घेतले. वडिलांनी टेम्पोचालक म्हणून काम करीत तर आईने शिवणकाम करीत संसाराला हातभार लावला. अशा परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत, नोकरी करीत प्रमोद यांनी परीक्षा दिली आणि यश मिळवले.

मेव्हणेही राज्यात प्रथमप्रमोद चौगुले यांचे मेव्हणे प्रसाद चौगुले यांनीही त्यांच्यापूर्वी राज्यसेवेच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यांच्या पाठोपाठ प्रमोद यांनी तसेच यश मिळविले.

मागच्या वर्षी प्रथम क्रमांक आला होता, पण हवे असलेले पद मिळाले नसल्याने मी पुन्हा परीक्षा दिली. त्यासाठी अभ्यास चालूच ठेवला. अभ्यासातील सातत्यामुळेच दुसऱ्यांदाही मोठे यश मिळविता आले.-प्रमोद चौगुले.

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षा