शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

कार्यालयांची वीज तोडण्याचा सपाटा

By admin | Updated: March 30, 2016 23:46 IST

आटपाडी तालुक्यात थकित वीजबिल : नोटिसा देऊनही दुर्लक्ष केल्याने कंपनीची कारवाई

आटपाडी : येथील बहुतांशी शासकीय कार्यालयांनी वीज वितरण कंपनीने अनेकवेळा नोटीस दिली, तरी न घाबरता अनेक महिन्यांपासून वीज बिलच भरलेले नाही. आता विजेची कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावल्याने त्यांच्यावर अंधारात बसण्याची वेळ आली आहे.वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाला विहिरीवरील पंपाची सोडून १ कोटी ७० लाख रुपये एवढी थकबाकी दि. ३१ मार्चपर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १९१ प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १८६ शाळांनी गेल्या वर्षभरात वारंवार नोटिसा पाठवूनही वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे या सर्व शाळांची वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. हे वीजबिल भरण्याची जबाबदारी काही विद्यार्थ्यांची नाही, पण आता सर्व शाळेतील ४७७१ विद्यार्थी आणि ४८५१ विद्यार्थिनी अशा एकूण ९६२२ विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या कालावधीत याचा फटका बसला आहे. आटपाडी पंचायत समितीचा कारभार कायम टक्केवारीने वादग्रस्त ठरलेला असताना या तालुक्याच्या विकासाच्या कार्यालयाचे वारंवार विजेचे कनेक्शन तोडण्यात येते. २४ जानेवारी रोजी ४१ हजार रुपये थकबाकीसाठी कनेक्शन तोडले होते. २६ जानेवारीच्या कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून त्यावेळी तातडीने २९ हजार भरले. बाकीचे नंतर भरतो म्हणून सांगितले. तेव्हा कनेक्शन जोडले. आता पुन्हा १९ हजार रुपये थकबाकीसाठी मंगळवार, दि. २९ रोजी कनेक्शन तोडले आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १९५३९ रुपये एवढी थकबाकी आहे. यापूर्वी दि. ५ मे २०१५ रोजी २८ हजार ९२० रुपये वीज बिल भरले होते. त्यानंतर बिल भरलेच नाही. त्यांचेही वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. आटपाडीच्या तलाठी कार्यालयातील विजेचे दि. १५ डिसेंबर १५ नंतर वीजबिल भरलेले नाही. १३०० रुपये थकबाकी आहे. त्यासाठी कनेक्शन तोडले आहे.नुकत्याच झालेल्या आम सभेत टेबलाखालून आणि वरुन बंडल घेतले जात असल्याच्या चर्चेने उजेडात आलेल्या येथील भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या सात दिवसांपासून अंधार आहे. या कार्यालयाची ४३३० रुपये वीजबिल थकित आहे.‘ट्रेझरी’चे कार्यालय १६८० रुपये थकबाकी असल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. स्वतंत्रपूर खुली वसाहतीच्या ‘रेस्ट हाऊस’चे वीजबिल दि. ११ मार्च २०१५ नंतर भरण्यात आलेले नाही. नोटिसा देऊनही वीजबिल न भरल्याने आता तेथील कनेक्शन तोडण्यात आले आहे. आटपाडी पोलिस ठाण्याकडे १ लाख ९२ हजार ७१० रुपये थकबाकी आहे. दि. २५ मे २०१५ रोजी पोलिसांनी ४८८६४ रुपये वीजबिल भरले होते. गेल्या १० महिन्यांपासून त्यांचे वीजबिल थकित आहे. शासकीय कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)थकबाकीदार ‘थ्री स्टार’!वीज वितरण कंपनीने थकबाकीदारांची श्रेणी केली आहे. थोडे दिवस थकबाकी ठेवणारे एक ‘स्टार’, नोटीस दिल्यावर लगेच थकबाकी भरणारे ‘दोन स्टार’ आणि नोटिसांना न जुमानता महिनो न् महिने थकबाकी न भरणारे ‘थ्री स्टार’ थकबाकीदार! तालुक्यात एकूण १५०० थकबाकीदार आहेत. त्यापैकी आटपाडीतील ८२७ ‘स्टार’ आहेत. त्यामध्ये गरीब परिस्थिती असलेले अत्यंत कमी आहेत.